हिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू
हिमाचल: कुलू बस अपघात (फोटो सौजन्य-ANI)

हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) कुलू (Kullu) जिल्ह्यात एका बसला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 35 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुर्घटना झालेल्या ठिकाणी मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

कुलू येथील बंजर भागात दरीत एक खासजी बस कोसळून खाली पडली. यामध्ये प्रवासांचा मृत्यू झाला असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये एकणू 50 प्रवासी असल्याची माहिती देण्यात येत आहे.

तर सध्या या अपघातामुळे बचाव कार्य सुरु आहे. खासगी बस बंजार येथून गादागुशानी येथे जाण्यासाठी निघाली असता हा अपघात झाला आहे.