PM Narendra Modi On Manipur Violence: मणिपूर हिंसाचार मुद्द्यावरुन विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला (No Confidence Motion) पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (10 ऑगस्ट) लोकसभा सभागृात उत्तर देणार आहेत. साधारण दुपारी 4.00 वाजता ते सभागृहाला संबोधित करण्याची शक्यता आहे. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (इंडिया) ने हा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावरील लोकसभेतील चर्चा शेवटच्या टप्प्यात आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती देताना म्हटले की, अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी लोकसभेत उपस्थीत राहतील आणि विरोधकांना उत्तर देतील. त्यांच्या भाषणाचे लाईव्ह प्रक्षेपण आपण येथे पाहू शकता. त्यासाठी खाली व्हिडिओवर क्लिक करा.
दरम्यान, लोकसभेमध्ये काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास चर्चेला सुरुवात केली होती. चर्चेदरम्यान ते म्हणाले की, मणिपूर मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'मौन व्रत' (मौन) तोडण्यासाठी विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणण्यास भाग पाडले गेले. संसदेमध्ये 20 जुलै पासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. परंतू, पंतप्रधानांनी मणिपूर विषयावर एक शब्दही न उच्चारल्यामुळे विरोधकांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. ज्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरादर गदारोळ पाहायला मिळाला.
संसदेत अविश्वास प्रस्ताव आल्यावर विरोधकांनी सरकारवर जोरदार प्रकाह केला. कास करुन गौरव गोगोई आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी खासदारपदी बहाल झाल्यानंतर संसदेतील त्यांच्या पहिल्या भाषणात भाजप सरकारवर टिकेची झोड उठवली. त्यांनी म्हटले की, सरकारने मणिपूरचे दोन तुकडे "विभाजन" केले. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजप सदस्यांनी आक्षेप घेतला. राहुल यांनी माफी मागावी अशी मागणी करत सभागृहात गदारोळ केला. इतकेच नव्हे तर राहुल गांधी सभागृहाबाहेर पडताना फ्लाईंग किसचा मुद्दाही अचानकच मध्ये काढला.
सरकारच्या वतीने सभागृहात अविश्वास प्रस्तावावर बोलताना केंद्रीय मंत्री स्मती इराणी यांनी, राहुल यांनी आपल्या दिशेने अयोग्य हावभाव केले" असा आरोप केला. तसेच भाजपच्या अनेक महिला खासदारांनी याबाबत अध्यक्षांकडे तक्रार केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर मणिपूर हिंसाचाराचे राजकारण केल्याचा आरोप केला आणि म्हणाले की भाजप या मुद्द्यावर चर्चेसाठी नेहमीच तयार आहे. ईशान्येकडील राज्यात हिंसाचार कमी होत असल्याचेही ते म्हणाले आणि त्यांनी विरोधकांना "आगीत इंधन टाकू नका" असे आवाहनही केले.
व्हिडिओ
पंतप्रधान मोदींनी अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिल्यानंतर मतदान होणार आहे. भाजपला लोकसभेत कमालीचे बहुमत आहे. त्यामुळे हा अविश्वास ठराव जिंकण्याची विरोधकांना सूतराम शक्यता दिसत नाही. एकट्या भाजपकडे 303 खासदार आहेत, जे बहुमताच्या 272 च्या पुढे आहेत, तर एनडीएचे 331 खासदार आहेत.