PM Modi with Donald Trump | File Image | (Photo Credits: Getty Images)

PM Modi on US Capitol Violence:  अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांचा विजय घोषित करण्यासाठी संसदेचे खासदार संयुक्त सत्रासाठी कॅप्टोल मध्ये बसले होते. त्याचवेळी संसदेच्या बाहेर डोनाल्ड्र ट्रंम्प (Donald Trump) यांच्या समर्थकांनी जोरदार आंदोलन करण्यास सुरुवात केली. तसेच आंदोलकांनी कॅप्टॉलच्या पायऱ्यांच्या येथे लावण्यात आलेले बॅरिगेट्स तोडले. तसेच आंदोलनादरम्यान, डोनाल्ड ट्रंम्प यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यामध्ये एक महिला सुद्धा जखमी झाली. यावेळी गोळी सुद्धा चालवण्यात आल्याने एका महिलेचा मृ्त्यू झाला. याच सर्व हिंसक प्रकारावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केले आहे.

अमेरिकेचे संसद कॅप्टॉलच्या बाहेर डोनाल्ड ट्रंम्प यांच्या समर्थकांकडून करण्यात येणाऱ्या हिंसक आंदोलनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. मोदी यांनी नाव न घेताल ट्रंम्प यांना सल्ला दिला की, सत्तेचा हस्तांतरण व्हावे असे म्हटले आहे. मोदी यांनी गुरुवारी या संदर्भातील एक ट्विट ही केले आहे. त्यांनी असे म्हटले की, वॉशिंग्टन डिसी मधील बातमी पाहून चिंता वाटते आहे. सत्तेचे हस्तांतरण शांतीपूर्ण पद्धतीने व्हावे. लोकशाही प्रक्रियेत अशा बेकायदेशीर पद्धती स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत.(US Capitol Violence: ट्रम्प समर्थकांकडून झालेल्या हिंसाचारी आंदोलनात एका महिलेचा मृत्यू; Twitter, Facebook आणि Youtube कडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई)

Tweet:

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांनी संसदचे संयुक्त सत्र सुरु होण्यापूर्वी असे म्हटले होते की, निवडणूकीत झालेला पराभव त्यांना मान्य नाही. त्यांनी असा आरोप ही लावला. तसेच ट्रंम्प यांनी असे ही म्हटले  की, हे कामकाज धोक्यात आले आणि हे लोकसत्ताक प्रतिस्पर्धी जे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बिडेनसाठी केले गेले आहे. ट्रंम्प यांनी वॉशिंग्टन डीसी मध्ये आपल्या हजारो समर्थकांना संबोधित करत असे म्हटले की, आपला पराभव कठोर झाल्यावर तुम्ही स्वीकारू नये. ”ट्रम्प यांनी एका तासाच्या भाषणात असा दावा केला की या निवडणुकीत त्यांनी भव्य विजय मिळविला आहे.