PM Modi | Twitter

मणिपूर ( Manipur) मध्ये हिंसाचार उफाळल्याच्या घटना समोर आल्या होत्या पण आता तेथे 2 महिलांची विवस्त्र अवस्थेत धिंड काढल्याचा संतापजनक प्रकार देखील एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे. यावर देशभर संताप व्यक्त केला जात असताना पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यावर भाष्य करत या प्रकारामुळे माझ्या मनात प्रचंद वेदना आणि राग असल्याचं म्हटलं आहे. ही गोष्ट देशाची मान खाली घालणारी आहे. कोणत्याही सभ्य समाजासाठी ही बाब लाजिरवाणी आहे. त्यामुळे आता त्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत सार्‍या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था मजबूत राहील यासाठी कटाक्षाने प्रयत्न करावेत असं आवाहन केले आहे.

मणिपूर घटनेतील आरोपींना कधीच माफी दिली जाणार नाही असंही प्रतिपादन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना केले आहे. दरम्यान या घटनेबाबत तपास सुरू आहे. सोशल मीडीयात काल वायरल झालेला व्हिडिओ हा मे महिन्यातील आहे. त्यामुळे त्याचा तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. नेटकरी, राजकीय नेते ते कलाकारांनी ही बाब लाजीरवाणी आणि क्लेषकारक असल्याचं म्हटलं आहे. Sharad Pawar On Manipur Issue: मणिपूरमधील महिलांवरील अत्याचाराचे विचलित करणारे- शरद पवार .

पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया 

 

भारत सरकारने सध्या हे प्रकरण तपासाधीन असल्याने ट्वीटर सह अन्य सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर त्याचे फोटोज, व्हिडिओज शेअर करणं टाळावेत असे आदेश दिले आहेत.

मणिपूर मध्ये इंफाळच्या जवळ 35 किमी अंतरावर असलेल्या कंगपोकपी जिल्ह्यातील ही घटना असल्याची माहिती समोर आली आहे. आजपासून दिल्लीत संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी मीडीयाला संबोधित करताना पंतप्रधांनी मणिपूरच्या या घटनेवर भाष्य करत आपला संताप व्यक्त केला आहे.