पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे परदेश दौरे 2014 पासून नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे संबंध सुधारण्यासाठी हे दौरे करणे महत्वाचे आहे असे जरी सांगण्यात येत असले किंबहुना आवश्यक जरी वाटत असले तरी या दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चाचे आकडे ऐकून कोणालाही धक्का बसेल. काही दिवसांपूर्वी याच विषयावरून मोदींच्या परदेश वाऱ्याच्या खर्चाविषयी विचारणा करण्यात आली होती, ज्यावर परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधर (V. Murlidhar) यांनी लेखी उत्तर देऊन पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावर पाच वर्षात सुमारे 446 कोटी खर्च झाल्याचे सांगितले. होली मिलन कार्यक्रमात यंदा सहभागी होणार नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी; कोरोना व्हायरस पासून सुरक्षित राहण्यासाठी घेतला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांमध्ये झालेल्या खर्चांमध्ये चार्टर्ड विमानांचा खर्चही सामिल असल्याचे मुरलीधर यांनी दिलेल्या उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. 2015-16 या कालावधीत त्यांच्या परदेश दौऱ्यांवर 121.85 कोटी रूपयांचा सर्वाधिक खर्च झाल्याची माहिती आहे, तर त्या पाठोपाठ, 2016-17 या कालावधीत 78.52 कोटी रूपये खर्च 2017-18 मध्ये 99. 90 कोटी रूपये, तर 2018-19 मध्ये 100.02 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला असल्याचे सुद्धा या उत्तरात समोर येत आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या वेबसाइटवरून समोर आलेल्या माहितीनुसार, मागील पाच वर्षात, मोदींनी तब्बल 44 देशांचे दौरे केले आहेत, ज्यामध्ये काही देशांच्या एकापेक्षा जास्त वाऱ्या सुद्धा आहेत. केवळ 2019 मध्येच मोदींनी, दक्षिण कोरिया, श्रीलंका, मालदीव, फ्रान्स, भूतान, युएई, बहरीन, युएसए आणि सौदी अरेबियाला भेट दिली होती. त्यांचा अमेरिका दौरा आणि त्यातील हाऊडी मोदी कार्यक्रम हा विशेष लक्षात राहणारा दौरा ठरला होता.