अयोध्या जमीन वाद (Ayodhya Land Dispute) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निर्णय दिला. या निकालानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासीयांना संबोधित केले. देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणात मोदी म्हणले, अयोध्या जमीन वाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने (r Supreme Court अंतिम निकाल दिला. या निकालापाठीमागे गेल्या शेकडो वर्षांचा इतिहास आहे. संपूर्ण देशाची इच्छा होती की, या प्रकरणाची न्यायालयात दररोज सुनावणी व्हावी. अखेर आज निर्णय आला. अनेक दशकं चालत आलेल्या एका ऐतिहासिक वादाचा निकाल लागला. संपूर्ण जगाला माहिती आहे की, भारत हा एक लोकशाही देश आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर ज्या पद्धतीने नागरिकांनी या निकालाचा मोठ्या मनाने स्वीकार केला. हा स्वीकार भारताची परंपराच दाखवतो, असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत विविधतेत एकता असलेला देश म्हणून ओळखला जातो. आज हा मंत्र एका पूर्णत्वाने देशासमोर आला. हजारो वर्षांनतर आजही भारताच्या बलस्थानांना समजून घ्यायचे असेल तर आजच्या घटनेचा जरूर उल्लेख करावा लागेल. ही घटना इतिहासाच्या पानांतून काढलेली नाही. सव्वा करोड जनतेने तिचे सृजन केले आहे. भारताच्या न्यायव्यवस्थेतील हा एक सुवर्णदिन आहे. (हेही वाचा, अयोध्या निकालानंतर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप सत्तासंघर्ष संपणार का? महाराष्ट्राला युतीचे स्थिर सरकार मिळणार का?)
एएनआय ट्विट
PM Modi: The whole country wanted that the Ayodhya case be heard daily, which happened and today a verdict has been delivered. This case which was going on for decades has concluded finally. #AyodhyaJudgment pic.twitter.com/w4D0uhhGPz
— ANI (@ANI) November 9, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर निर्णय दिला. हा निकाल सर्वांना आवडला ही अत्यंत आनंदाची बाब आहे. एक नागरिक म्हणून आपण जाणताच की, एखादा निर्णय देताना किती कठीण असते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाचे न्यायाधीश, न्यायालय आणि न्यायव्यवस्था अभिनंदनास पात्र आहे.