अयोध्या निकालानंतर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप सत्तासंघर्ष संपणार का? महाराष्ट्राला युतीचे स्थिर सरकार मिळणार का?
BJP Vs Shiv Sena | (Photo Credit: Archived, edited, representative images)

शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन रंगलेला वाद हा महाराष्ट्राच्या सरकारस्थापनेतील मोठा अडथळा ठरला आहे. त्यामुळे जनमत भाजप-शिवसेना युतीच्या बाजूने असले तरीही सरकार स्थापन होऊ शकले नाही. भाजपने मुख्यमंत्री पदाचा दिलेला शब्द पाळावा आणि समसमान सत्तावाटप करावे, अशी शिवसेनेची भूमका तर समसमान सत्तावाटप असे काही ठरलेच नव्हते, असे भाजपचे म्हणने. या सर्व घोळात सरकारस्थापना रखडली आणि 2014 ते 2019 या कालावधीतील विधानसभा सभागृहाचा पर्यायाने राज्य सरकारचा कार्यकाळही संपला तरीही सरकार स्थापन झाले नाही. दरम्यान, समसमान सत्तावाटपाचे बोलत असाल तर सांगा अन्यथा शिवसेनेचे परत फिरण्याचे सर्व दोर कापले असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांन स्पष्ट केले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या जमीन वाद (Ayodhya Land Dispute) प्रकरणाचा निकाल दिला. आता या निकालानंतर हिंदूत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येत शिवसेना-भाजप 'मंदिर वही बनायेंग' असे म्हणत एकत्र येणार की, हिंदुत्त्वाचा मुद्दा आपापल्या ठिकाणी कायम ठेवत सत्तावाटपाचा वाद कायम ठेवणार याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, 6 डिसेंबर 1992 या दिवशी अयोध्या येथे कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्या वेळी देशभरात प्रचंड हिंसाचार झाल. या हिंसाचारानंतर झालेल्या कारवाईत अनेकांवर आरोपपत्र दाखल झाले. अनेक कारसेवक आणि आंदोलकांना अटक झाली. मशिद पाडण्याचे कृत्य नेमके कोणी केले यांवरुन पुढे बरेच आरोप प्रत्यारोप केले. या कृत्यात शिवसेनेचा हात असल्याचेही बोलले जात होते. दरम्यान, या सर्व गदारोळात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे पुढे आले. त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'बाबरी जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर, मला त्याचा अभिमान आहे'. ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर हिंदूहृदयसम्राट ही उपाधी त्यांना दिली गेली. तेव्हापासून शिवसेना-हिंदूत्व आणि भाजपसोबतची युती हे समीकरण अधिक घट्ट होत गेले.

दरम्यान, शिवसेना आणि भाजप यांची युती ही बाबरी मशिद पाडण्याआधीच म्हणजे 1990 मध्ये झली होती. भाजप नेते प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे आणि लालकृष्ण अडवाणी हे या युतीचे शिल्पकार होते. ही युती हिंदूत्वाच्या मुद्द्यावर झाली. पुढे या युतीचे सरकारही राज्यात आणि केंद्रात सत्तेत आले. पण, पुढे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले आणि त्यानंतर काही महिन्यांनीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत (2014) शिवसेना भाजप ही युती भाजप नेत्यांनी तोडली. भाजपचे तत्कालीन नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेत्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तशी घोषणा केली. (हेही वाचा, आमच्या येथे सर्व प्रकारचे राजकीय माज उतरून मिळतील, सोशल मीडियावर राजकीय स्थितीवर विनोदांची लाट)

विधानसभा निवडणूक 2014 नंतर अल्पमतात सत्तेत आलेल्या भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाहेरुन पाठिंबा दिला आणि आवाजी मतदानाने हे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमालीची कमी झाली. शिवसेनेला भाजपमागे मिळतील ती पदे आणि सत्तेचा तुकडा गोड मानून घेत फरफटत जावे लागेल. 2014 ते 2019 या काळात भाजपने शिवसेनेला येथेच्छ कोंडीत पकडले. तरीही शिवसेनेने विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजपसोबत युती केली.ही युती करतानाही भाजपने शिवसेनेला चांगलेच झुंजवले. अखेर 288 पैकी भाजप 164, शिवसेना 124 जागांवर लढले तर उर्वरीत जागांवर मित्रपक्ष लढले. (हेही वाचा, शिवनेरी येथील माती घेऊन उद्धव ठाकरे आयोध्येला पुन्हा जाणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचेही केले स्वागत)

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये युती करताना हिंदुत्व आणि सत्तेचे समसमान जागावाटप या मुद्द्यावर युती घडून आली होती. शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांच्या शिर्षस्थ नेत्यांच्या पत्रकार परिषदेतही देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पक्षांमध्ये पद आणि सत्तेचे समसमान वाटप होईल असे जाहीर सांगितले होते. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनीही शिवसेना भाजप हे दोन्ही पक्ष 288 पैकी 135-135 जागा लढवतील. उर्वरीत 18 जागा मित्रपक्षांना सोडल्या जातील असे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र भलतेच घडताना दिसले. (हेही वाचा, शिवनेरी येथील माती घेऊन उद्धव ठाकरे आयोध्येला पुन्हा जाणार; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचेही केले स्वागत)

दरम्यान, विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल लागला. भाजप हा 105 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर, त्या खालोखाल शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. विधानसभा निवडणूक 2019 चा जनादेश पाहता भाजप – 105, शिवसेना – 56, राष्ट्रवादी – 54, काँग्रेस – 44, बहुजन विकास आघाडी – 03, प्रहार जनशक्ती – 02, एमआयएम – 02, समाजवादी पक्ष – 02, मनसे – 01, माकप – 01, जनसुराज्य शक्ती – 01, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01, शेकाप – 01, रासप – 01, स्वाभिमानी – 01, अपक्ष – 13 जागांवर विजयी झाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल पहता शिवसेना हा किंगमेकर पक्ष ठरला. आता हिच ती वेळ असे म्हणत शिवसेनेने ठरलंय तस करा असे म्हणत भाजपकडे समसान जागावाटपाचा मुद्दा मांडत अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री असा मुद्दा उपस्थित केला. यावर भाजपने नकार दिला आणि शिवसेना-भाजप सत्तासंघर्षास इथूनच सुरुवात झाली. आजही हा संघर्ष कायम आहे. आत आयोध्या निकालाच्या पार्श्वभीमवर हिदुत्त्वाच्या मुद्द्यावर यो दोन मुद्द्यांवर हा वाद संपणार का हाच एक उत्सुकतेचा विषय.