Mann KI Baat | PM Narendra Modi | (Photo Credit: ANI)

नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दुसऱ्या पर्वातील पहिल्या 'मन की बात' (Mann Ki Baat)  सत्राचं आयोजन आज म्हणजेच 30 जून 2019 रोजी करण्यात आलं आहे. सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी आकाशवाणी वरून देशातील 130 कोटी जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात सामान्य जनतेला सहभागी होता यावे यासाठी 1800-11-7800 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. यावर तुम्ही आपले प्रश्न पाठवू शकता याशिवाय MyGov Open Forum या साईटवर देखील आपले मत किंवा प्रश्न मांडता येणार आहेत. हे सत्र आपण AIR, दूरदर्शन व नरेंद्र मोदी मोबाईल ऍप (Narendra Modi Mobile App) वर ऐकू शकता. सकाळी 11 वाजता सर्वात अर्धे आकाशवाणीवर हे सत्र हिंदी मध्ये प्रसारित करण्यात येईल आणि त्यापाठोपाठ लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा 'मन की बात' ऐकता येणार आहे.

नरेंद्र मोदी ट्विट

हे ही वाचा - खासदार डॉ अमोल कोल्हे आणि डॉ. हिना गावित यांच्या लोकसभेतील भाषणाला नरेंद्र मोदींनी दिली कौतुकाची थाप (Watch Video)

2014 मध्ये सत्तेत आल्यापासून मोदींनी मन की बात या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधण्यास सुरवात केली होती, त्यानंतर सलग पाच वर्षे हा कार्यक्रम सुरु होता, लोकसभा निवडणुकांच्या आधी 24 फेब्रुवारीला या कार्यक्रमाचे शेवटचे सत्र पार पडले होते. त्यानंतर आता पुन्हा सत्तेत आल्यावर हे मन की बात चे पहिले सत्र असणार आहे.याविषयी अगोदरच लोकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. हाच उत्साह कायम ठेवून यामध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे तसेच वेगवेगळे थीम आणि विचार शेअर करावेत असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.