
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी आज सकाळी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS Delhi) येथे भेट देऊन उपराष्ट्रपती जगदीप धनखर (Vice President Jagdeep Dhankhar) यांच्या प्रकृतीची चौकशी केली. छातीत दुखणे आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने काल (8 मार्च) रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंतप्रधानांनी त्यांच्या लवकर बरे होण्याची प्रार्थनाही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: एक्स (जुने ट्विटर) वर पोस्ट लिहीत याबाबत माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, एम्समध्ये जाऊन उपराष्ट्रपती जगदीप धनखर जी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो, असे पंतप्रधानांनी ऑनलाइन पोस्टमध्ये शेअर केले.
उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या आरोग्याची माहिती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 73 वर्षीय उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांना रविवारी पहाटे 2 वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) मध्ये नेण्यात आले. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की उपराष्ट्रपतींची प्रकृती स्थिर आहे आणि डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. (हेही वाचा, Jaya Bachchan And Jagdeep Dhankhar Over Amitabh: महिलांना पतीच्या नावानेच का ओळखले जावे? जया बच्चन यांचा जगदीप धनखड यांच्याबोत शाब्दिक खटका (Watch Video))
केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनीही एम्सला भेट दिली
उपराष्ट्रपतींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनीही आदल्या दिवशी एम्सला भेट दिली. आरोग्यमंत्र्यांनी उपचारांबाबत चर्चा केली आणि उच्च वैद्यकीय सेवा पुरवली जात असल्याची खात्री केली. (हेही वाचा, Amitabh- Jaya Bachchan Marriage: बिग बींनी अखेर सांगितले जया बच्चनशी लग्न करण्यामागचे खरे कारण)
उपराष्ट्रपती डॉक्टरांच्या निगराणीखाली
सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार उपराष्ट्रपती आता स्थिर आहेत परंतु वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. पुढील वैद्यकीय पावले उचलण्यासाठी तज्ञांची एक टीम त्यांच्या प्रकृतीचे सतत मूल्यांकन करत आहे. देश उपराष्ट्रपतींच्या प्रकृतीबद्दल पुढील अपडेट्सची वाट पाहत आहे, नेते आणि हितचिंतक त्यांच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करत आहेत.
जगदीप धनखड हे एक भारतीय राजकारणी आणि वकील आहेत. विद्यमान स्थितीत ते भारताचे उपराष्ट्रपती आहेत. जे 11 ऑगस्ट 2022 पासून भारताचे उपराष्ट्रपती म्हणून काम करत आहेत. यापूर्वी त्यांनी 2019 ते 2022 पर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि 10190 ते 1991 पर्यंत केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री यासह अनेक प्रमुख पदांवर काम केले. ते संसद सदस्य आणि राजस्थान विधानसभेचे सदस्य देखील राहिले आहेत.
18 मे 1951रोजी राजस्थानमधील किथाना येथे जन्मलेले धनखड यांना कायद्याची पार्श्वभूमी आहे आणि राजस्थान उच्च न्यायालयाने त्यांना वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते. त्यांच्या कारकिर्दीत ते भारतीय जनता पक्ष (भाजप), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आयएनसी) आणि जनता दल (जेडी) यासह अनेक राजकीय पक्षांशी संलग्न राहिले आहेत.