मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) रीवा येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून मोठी दुर्घटना (Plane Crash in Rewa) घडली. दुर्घटनाग्रस्त विमान मंदिराच्या घुमटावर आदळले आणि त्यानंतर कोसळले. या घटनेत विमानात उपस्थित पायलट आणि प्रशिक्षणार्थी गंभीर जखमी झाले. या अपघातात बिहारमधील पाटणा येथील रहिवासी वरिष्ठ पायलट कॅप्टन विमल कुमार (Pilot Captain Vimal Kumar) यांचा मृत्यू झाला. ते 54 वर्षांचे होते. तो बिहारमधील पाटणा येथील रहिवासी होते. विमान दुर्घटनेनंतर परिसरामध्ये (Plane Crash in Madhya Pradesh) भीतीचे वातावरण होते.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार खाजगी प्रशिक्षण कंपनीचे विमान मंदिराचा घुमट आणि विद्युत तारांना धडकले. ज्यामुळे पुढच्या काहीच क्षणात विमान अपघातग्रस्त झाले. ही घटना चौरहता पोलीस स्टेशन हद्दीतील उमरी गावाच्या मंदिराजवळ घडली. जखमी पायलटला संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा, Viral Video: आकाशातून कोसळणारे विमान मुलाने गच्चीवर पकडले; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का, Watch)
दाट धुके हे विमान अपघाताचे प्रमुख कारण ठरल्याची माहिती प्राथमी चौकशीत पुढे आली आहे. उमरी विमानतळावर प्लॅटून कंपनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत असे. गुरुवारी रात्री 11.30 वाजता पायलट कॅप्टन विमल कुमार जयपूर येथील सोनू यादव या विद्यार्थ्याला प्रशिक्षण देत होते. टेक ऑफ केल्यानंतर विमान मंदिराच्या घुमटावर आदळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि विमानाचे नुकसान झाले. स्फोटाचा आवाज ऐकून लोकांनी घराबाहेर धाव घेतली आणि विमानाचे अवशेष त्यांना आढळून आले.
ट्विट
Madhya Pradesh | A pilot died while another was injured after a plane crashed into a temple in Rewa district during the training: Rewa SP Navneet Bhasin pic.twitter.com/KumJTAlALs
— ANI (@ANI) January 6, 2023
स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी संजय गांधी रुग्णालयात दाखल केले. ज्यामध्ये उपचारादरम्यान गुरुवारी रात्री उशिरा पायलटचा मृत्यू झाला. विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून, उपचार सुरू आहेत.