Viral Video: आकाशातून कोसळणारे विमान मुलाने गच्चीवर पकडले; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का, Watch
Plane Crash Viral Video (PC- Instagram)

Viral Video: सोशल मीडियावर रोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. यातील काही व्हिडिओ आपली चांगलीचं फसवणूक करतात. सध्या असाचं एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ विमान अपघाताशी संबंधित आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, आकाशात उडणारे विमान अचानक असंतुलित होते आणि ते पडताच एक मुलगा त्याला पकडतो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आकाशात उडणारे विमान नियंत्रण गमावून वेगाने जमिनीकडे येताना दिसत आहे. ते क्रॅश होणार आहे असे प्रत्येकाला वाटते. पण व्हिडिओ फ्रेममध्ये जे दिसत आहे, ते सर्वांचे मन हेलावणारे आहे. खरे तर आकाशात दिसणारे विमान हे एक खेळणे असून त्याचा आकार मोठा असल्याने ते सर्वांच्या डोळ्यांना चकवा देत आहे. (हेही वाचा -Girls Fight Over Boyfriend: बॉयफ्रेंडसाठी 5 मुलींमध्ये हाणामारी; झिंज्या उपटत एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण; पाहा व्हिडिओ)

पहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by VIDEO NATION (@videonation.teb)

वास्तविक, आकाशात उडणाऱ्या या विमानाला एक मुलगा रिमोटवरून नियंत्रित करत होता. शेवटी तुम्हाला दिसेल की तो उभा होता तिथे विमान पडते आणि मुलगा दोन्ही हातांनी ते पकडतो. videonation.teb नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.