Girls Fight Over Boyfriend: बॉयफ्रेंडसाठी 5 मुलींमध्ये हाणामारी; झिंज्या उपटत एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण; पाहा व्हिडिओ

मुलीसाठी मुलांमध्ये भांडणे, हाणामारी होणे ही आजवरची एक सर्वसामान्य बाब. अनेक चित्रपट, शाळा, महाविद्यालये आणि शहर, गावांमध्ये अशा घटना आपण सर्रास पाहतो आणि ऐकतोही. पण बिहार (Bihar Girls) राज्यातील सोनपूर (Sonpur Girls Fight) येथे काहीशी विचित्र म्हणावी अशीच घटना घडली. येथे एका मुलासाठी म्हणजेच बॉयफ्रेंडसाठी चक्क 5 तरुणींमध्ये जोरदार हाणामारी (Girls Fight Over Boyfriend) झाली. या पाचही जणींनी एकमेकींच्या झिंज्या उपटत, एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण (Girls Fight) केली. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल झाला आहे. मारहाणीची ही घटना एका जत्रेत घडली.

व्हायरल व्हिडिओ नेमको कधीचा आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. तसेच, व्हिडिओमध्ये ऑडीओही नाही. परंतू, सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. सांगितले जात आहे की, एका बॉयफ्रेंडसाठी मुलींमध्ये हा राडा झाला. ही घटना ज्या मुलामुळे घडली तो मुलगा (बॉयफ्रेंड) सुद्धा जत्रेत आला होता. तसेच, त्याच्यासोबत एक गर्लफ्रेंडही होती. तिला पाहताच मुलींचा पारा चढला. (हेही वाचा, Girls Fight Viral Video: मुलींच्या दोन गटात तुफान हाणामारी; एकमेकींच्या झिंज्या उपटून लाथा-बुक्क्यांनी मारहाण (Watch))

व्हिडिओ

सांगितले जात आहे की, ज्या मुलावरुन हा राडा झाला तो मुलगा एका मुलीचा एक्स बॉयफ्रेंड होता. दोघांमध्ये ब्रेकअप झाले होते. दोघेही स्वतंत्रपणे जत्रेत आले होते. अशा वेळी बॉयफ्रेंड (तो मुलगा) एका मुलीसोबत फिरायला आला होता. ती मुलगी त्याची विद्यमान गर्लफ्रेंड होती असे सांगितले जात आहे. दुसऱ्या बाजूला एक्स गर्लफ्रेंडही जत्रेला आली होती. दोघांची नजरानजर होताच. एक्सचा पारा चढला. तिने बॉयफ्रेंडच्या विद्यमान गर्लफ्रेंडला जाब विचारणे सुरु केले. सुरुवातीला मुद्द्यांवरुन चाललेले भांडण बाचाबाचीपर्यंत पोहोचले. त्यानंततर थेट हाणामारीलाच सुरुवात झाली. हाणामारी सुरु होताच एक्स गर्लफ्रेंडच्या मैत्रिणीही त्यात सहभागी झाल्या. सांगितले जात आहे की, भांडणात सहभागी झालेल्या चौघीही म्हणे त्या मुलावर प्रेम (एकतर्फी) करत होत्या. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही.