भारतामध्ये पुढे येणार्या दिवाळी, दसर्याच्या पार्श्वभूमीवर आता नोकरीधारकांना सरकारने मोठी खूषखबर दिली आहे. केंद्रीय श्रम मंत्रालय मंत्री, संतोष गंगावार (Santosh Gangwar)Santosh Gangwar यांनी दिलेल्या माहितीनुसार आता नोकरधारकांना 2018-19 मधील त्यांच्या पीएफ ठेवींवर 8.65% व्याज (PF Interest Rate for 2018-19) मिळणार आहे. यापूर्वी हा व्याजदर 8.55 इतका होता. याचा फायदा सुमारे 6 कोटी नोकरधारकांना होणार आहे. आज दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. EPFO: खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 100 टक्क्यांपेक्षाही अधिक पेन्शन; सर्वोच्च न्यायालयामुळे मार्ग मोकळा
केंद्र सरकारने 2017-18 साली त्यांच्या ठेवीवर व्याजदर 8.55 ठरवला होता. मात्र आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालय आणि श्रम मंत्रालयामध्ये झालेल्या चर्चेनंतर हा बदल स्वीकारण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि श्रम मंत्री संतोसः गंगवार यांची नुकतीच दिल्लीत भेट झाली. त्यावेळेस हा निर्णय घेण्यात आला आहे. पीएफ अकाऊंटवरील व्याजदर ठरवताना Central Board of Trustees महत्त्वाची भूमिका बजावते. 19 फेब्रुवारी दिवशी त्यांची एक मीटिंग झाली. यावेळेस आर्थिक वर्ष 2019 साठी 8.65% हा दर ठरवण्यात आला.
पीएफ काढण्याची प्रक्रिया देखील आता सुकर झाली आहे. पूर्वी नोकरी बदलताना लोकं फंड ट्रान्सफर करत होते. मात्र आता बदलत्या काळानुसार अनेक जण नोकरी बदलताना फंड काढून घेतात. अवघ्या 3-4 कार्यकालीन दिवसामध्ये तुम्हांला ऑनलाईन माध्यमातून पीएफ तुमच्या बॅंक खात्यामध्ये ट्रान्सफर करता येणार आहे.