देशातील पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पाठिमागील 11 दिवसांपासून इंधन कंपन्यांनी देशातील इंधन दर पुन्हा एकदा वाढवले आहेत. हे दर केवळ आठ दिवसांमध्ये वाढले आहेत. सोमवारी (4 ऑक्टोबर 2021) आज तेल दरांमध्ये फारसे बदल झाले नाहीत. मात्र, या आठवड्यांमध्ये डिझेल प्रति लीटर दोन रुपये आणि पेट्रोल प्रति लीटल 1 रुपयांनी वाढले आहेत. आता रविवारी तेल दर पुन्हा चौथ्या दिवशी वाढले. रविवारी पेट्रोल 25 पैसे तर डीझेल 30 पैसे प्रति लीटर दराने वाढले.
कच्चा तेलाबाबत बोलायचे तर हा तर प्रति बॅरल 78 डॉलर रुपयांनी विकला जात आहे. पाठिमागील काही काळात आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड 0.47% घसरुन 77.94 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. कच्चा तेलाच्या वाढत्या किमती देशातील नागरिकांच्या खिशावर भार टाकतात. त्यातच केंद्र आणि राज्य सरकारने आपापले कर त्यावर लावल्याने नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागते. तसेच, केंद्र आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या करप्रणालीमुळे प्रत्येक राज्यात आणि शहरात दर वेगवेगळे असतात. (हेही वाचा, Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दर दररोज घ्या जाणून फक्त एका SMS च्या माध्यमातून)
भारतातील प्रमुख शहरातील इंधन दर
दिल्ली:
पेट्रोल - ₹102.39 प्रति लीटर
डिझेल - ₹90.77 प्रति लीटर
मुंबई:
पेट्रोल – ₹108.43 प्रति लीटर
डिझेल – ₹98.48 प्रति लीटर
कोलकाता:
पेट्रोल – ₹103.07 प्रति लीटर
डिझेल – ₹93.87 प्रति लीटर
चेन्नई:
पेट्रोल –100.01 रुपये प्रति लीटर
डिझेल – ₹95.31 प्रति लीटर
बेंगलुरु:
पेट्रोल –₹105.95 प्रति लीटर
डिझेल – ₹96.34 प्रति लीटर
भोपाल:
पेट्रोल – ₹110.88 प्रति लीटर
डिझेल – ₹99.73 प्रति लीटर
लखनऊ:
पेट्रोल-98.99 रुपये प्रति लीटर
डिझेल - 90.69 रुपये प्रति लीटर
पटना:
पेट्रोल –₹105.24 प्रति लीटर
डिझेल – ₹97.10 प्रति लीटर
चंडीगढ़:
पेट्रोल –₹98.56 प्रति लीटर
डिझेल – ₹90.50 रुपये प्रति लीटर
देशातील प्रत्येक पेट्रल पंपावर दररोज सकाळी 6 वाजता नवे दर लागू होतात. कारण प्रत्येक ठिकाणचे स्थानिक महसूली कर वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात अनेकदा पेट्रोल डिझेल तर वेगवेगळे असू शकतात. आपण पेट्रोल-डिझेलचे आपल्या प्रदेशातील दर SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला इंडियन ऑयल SMS सेवेच्या माध्यमातून मोबाइल नंबर 9224992249 वर SMS पाठवू शकता. त्यासाठी आपला मेसेज असा लिहायला हवा. RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलर कोड. आपल्या परिसरातील RSP साईटवर जाऊन तपासू शकता. हा मेसेज पाठवल्यानंतर काही सेकंदात आपल्या फोनवर ताजे पेट्रोल, डिझेल दर उपलब्ध होऊ शकतात.