पेट्रोल-डिझेल च्या दरात पुन्हा वाढ; अमेरिका आणि इराणमधील तणावाचा मुंबईकरांना फटका
पेट्रोल, डिझेल Photo Credits: PTI)

अमेरिका-इराणमधील तणावाची झळ आता भारतालाही पोहोचू लागली आहे. ज्याचे परिणाम आता सोने-चांदीसह पेट्रोल-डिझेलवरही (Petrol-Diesel) दिसू लागले आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षाने जागतिक कमोडिटी बाजारात खनिज तेलाच्या किमती वाढू लागल्या आहेत. खनिज तेल दरवाढीची झळ भारताला बसत असून पेट्रोलियम कंपन्यांनी सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलीटर 81 रुपये 28 पैसे तर डिझेल प्रति लीटर 72 रुपये 2 पैसे इतकं झालं आहे.

पेट्रोल-डिझेलचे काही दिवसांपासूनचे दर पाहता सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर महागले आहेत. सलग पाचव्या सत्रात पेट्रोल आणि डिझेल महागले. दिल्लीत पेट्रोल दरात सोमवारी दरात 15 पैशांची वाढ झाली आहे. डिझेल 17 पैशांनी महागलं आहे. पेट्रोलचा दर 75.69 रुपये आणि डिझेल 68.68 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल 15 पैसे आणि डिझेल 18 पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लीटर 81 रुपये 28 पैसे झाला आहे. Gold Rate Today: सोनं महागलं, सराफा बाजारातील आजचे दर 41 हजारांच्या पार

डिझेल दर प्रति लीटर 72 रुपये 2 पैसे झालं आहे. चेन्नईत पेट्रोल 16 पैशांनी महागले असून दर 78.28 रुपये झाले आहे.डिझेलचा दर 72.59 रुपये असून त्यात रविवारच्या तुलनेत 19 पैशांची वाढ झाली. कोलकात्यात पेट्रोल 78.28 रुपये आणि डिझेल 71.04 रुपये आहे.

अमेरिका आणि इराण एकमेकांसमोर उभे ठाकले असून जगभर युद्धाचे सावट आहे. यामुळे आखाती देशातील खनिज तेल उत्पादनावर आणि पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

इतकच नव्हे तर आठवड्याच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय गोल्ड मार्केट मध्ये सोन्याच्या दरांनी गेल्या 7 वर्षांतला रेकॉर्ड मोडला आहे. त्याचसोबत MCX येथे सुद्धा सोन्याचे दर वेगाने वाढत असल्याचे दिसून आले.