पेट्रोल, डिझेल यांच्या आज पुन्हा किंमती वाढल्या आहेत. दिल्ली मध्ये आज इंधन 35 पैशांनी वधारलं आहे तर मुंबई मध्ये पेट्रोल 34 पैसे आणि डिझेल 37 पैशांनी वधारलं आहे. चैन्नई मध्येही पेट्रोल 31 पैसे आणि डिझेल 33 पैशांनी वाढलं आहे. दिवसागणिक पुन्हा वाढणारी पेट्रोल, डिझेलची किंमत सर्वसामान्यांच्या आर्थिक गणिताचे तीन तेरा वाजवत आहे. दररोज सकाळी 6 वाजता भारतामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर केले जातात. त्यावर वॅट, लोकल टॅक्स लावल्यानंतर प्रत्येक राज्यात इंधनाचे दर वेगवेगळे आहेत. नक्की वाचा: Petrol Diesel Price and Taxes: पेट्रोल, डिझेलवर कसा लागतो कर आणि वाढते इंधनाची किंमत? घ्या जाणून.
आज भारतामध्ये सलग तिसर्या दिवशी इंधनदरामध्ये 35 पैशांपेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबई मध्ये इंधनाचे दर सर्वात जास्त आहेत. देशात अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल ने शंभरी पार केलेलीच आहे.
जाणून घ्या भारतातील महत्त्वाच्या शहरातील इंधन दर
मुंबई
पेट्रोल - Rs 112.78 प्रति लीटर
डिझेल - Rs 103.63 प्रति लीटर
दिल्ली
पेट्रोल - Rs 106.89 प्रति लीटर
डिझेल- Rs 95.62 प्रति लीटर
चैन्नई
पेट्रोल - Rs 103.92 प्रति लीटर
डिझेल - Rs 99.92 प्रति लीटर
कोलकाता
पेट्रोल - Rs 107.44 प्रति लीटर
डिझेल - Rs 98.73 प्रति लीटर
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियन यांच्याकडून रोज सकाळी 6 वाजता देशातील पेट्रोल, डिझेलच दर जाहीर केलेल जातात. दरम्यान भारतामधील इंधन दर हा आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रुड ऑईलच्या किंमती आणि रूपया व डॉलरच्या एक्सचेंज रेट वर अवलंबून असतो.
ब्रेंट क्रुड च्या इंटरनॅशनल बेंचमार्क वर गुरूवारी ते प्रति बॅरेल USD 85 आहे. हा मागी महिन्याच्या तुलन्यात USD 11 अधिक आहे.