देशातील पेट्रोल, डिझेल ( Petrol, Diesel) दरांनी विक्रम गाठला. इतिहासात प्रथमच इंधन दर इतक्या प्रचंड वेगाने वाढले. देशभरातून टीका होऊ लागली, महागाईसुद्धा गगनाला भिडली. परिणामी केंद्र सरकारने इंधन दरांवर लावले जाणारे उत्पादन शुल्क (Excise Duty) कमी केले. त्यामुळे पेट्रोल, डिझेलच्या किंमती काहीशा कमी झाल्या. विविध राज्यांनीही आपला व्हॅट कमी केला. त्यामुळे नागरिकांना आणखी अल्पसा दिलासा मिळाला. आज सलग 24 वा दिवस आहे. देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. जाणून घ्या देशातील प्रमख शहरांतील पेट्रोल, डिझेल दर (Fuel Price Today).
देशातील प्रमुख शहरांतील इंधन दर
दिल्ली:
पेट्रोल – ₹103.97 प्रति लीटर
डिझेल - ₹86.67 प्रति लीटर
मुंबई:
पेट्रोल – ₹109.98 प्रति लीटर
डिझेल – ₹94.14 प्रति लीटर
कोलकाता:
पेट्रोल – ₹104.67 प्रति लीटर
डिझेल – ₹89.79 प्रति लीटर
चेन्नई:
पेट्रोल – 101.40 रुपये प्रति लीटर
डिझेल – ₹91.43 प्रति लीटर
नोएडा:
पेट्रोल – ₹95.51 प्रति लीटर
डिझेल – ₹87.01 प्रति लीटर
भोपाल:
पेट्रोल – ₹107.23 प्रति लीटर
डिझेल – ₹90.87 प्रति लीटर
बेंगलुरु:
पेट्रोल – ₹100.58 प्रति लीटर
डिझेल – ₹85.01 प्रति लीटर
लखनऊ:
पेट्रोल- 95.28 रुपये प्रति लीटर
डिझेल - 86.80 रुपये प्रति लीटर
चंडीगढ:
पेट्रोल – ₹94.23 प्रति लीटर
डिझेल – 80.90 रुपये प्रति लीटर
(हेही वाचा, Petrol, Diesel Price: काय सांगता? पुन्हा वाढणार पेट्रोल, डिझेल दर? Excise Duty ठरणार केवळ वरवरचा मुलामा?)
देशातील प्रत्येक पेट्रल पंपावर दररोज सकाळी 6 वाजता नवे दर लागू होतात. कारण प्रत्येक ठिकाणचे स्थानिक महसूली कर वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात अनेकदा पेट्रोल डिझेल तर वेगवेगळे असू शकतात. आपण पेट्रोल-डिझेलचे आपल्या प्रदेशातील दर SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला इंडियन ऑयल SMS सेवेच्या माध्यमातून मोबाइल नंबर 9224992249 वर SMS पाठवू शकता. त्यासाठी आपला मेसेज असा लिहायला हवा. RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलर कोड. आपल्या परिसरातील RSP साईटवर जाऊन तपासू शकता. हा मेसेज पाठवल्यानंतर काही सेकंदात आपल्या फोनवर ताजे पेट्रोल, डिझेल दर उपलब्ध होऊ शकतात.