
भारतामध्ये आज पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर पुन्हा वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतींनी रेकॉर्डब्रेक उसळी घेतल्याने 2014 नंतर देशात इंधनदरात पुन्हा वाढ बघायला मिळाली आहे. पेट्रोलच्या किंमती 30 पैशांनी प्रतिलीटर तर डिझेलच्या किंमती 35 पैशांनी दिल्ली मध्ये वाढल्या आहेत. मुंबई मध्येही पेट्रोलचे दर आज 29 पैशांनी तर डिझेलचे दर आज 37 पैशांनी वाढले आहेत. वाढती इंधनदरवाढ सर्वसामान्यांचं घरगुती बजेट मोडत आहे.
आज मुंबई मध्ये पेट्रोलची रिटेल किंमत प्रती लीटर Rs 108.96 आहे. तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर म्हणजेच Rs 99.17 प्रति लीटर आहे. मेट्रो सिटी मध्ये इंधनाचे हे सर्वाधिक दर आहेत.
प्रत्येक राज्यागणिक इंधन दर वेगवेगळे आहेत. लोकल टॅक्स ज्यामध्ये वॅट आणि freight charges यांचा समावेश असतो ते देखील प्रत्येक राज्यात वेगळे असल्याने भारतात प्रत्येक राज्याचा पेट्रोल-डिझेलचा दर वेगळा आहे.
भारतातील प्रमुख शहरातील इंधन दर
- मुंबई - 108.96 (पेट्रोल), 99.17 (डिझेल)
- दिल्ली - 102.64 (पेट्रोल), 91.42 (डिझेल)
- चैन्नई - 100.49 (पेट्रोल), 95.93 (डिझेल)
- कोलकाता - 103.65 (पेट्रोल), 94.53 (डिझेल)
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
जगभरात कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. जशी मागणीत वाढ होत आहे तसा पुरवठा देखील वाढेल अशी आशा होती मात्र ओपेक ने पुरवठ्यामध्ये फक्त चार लाख बॅरेलची वाढ केली आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारात दिवसागणिक इंधनाचे दर वाढत आहे. भारतातही इंधन आयात करून गरज पुरवली जात असल्याने या किंमतींचा थेट फटका बसत आहे.
दरम्यान नियमित सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलची मूळ रक्कम ऑईल कंपन्यांकडून जाहीर केल्या जातात. त्यावर शहरानुसार टॅक्स प्रमाणे आणि अन्य करांनुसार किंमती वर खाली होत असतात. वेगवेगळ्या कंपन्यांनुसार हे इंधनाचे दर बदलतात. त्यामुळे योग्य दर जाणून घ्यायचा आल्यास तुम्हांला ऑनलाईन अॅप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून दर पाहता येऊ शकतात.
कसे पहाल अचूक दर?
तुमच्या शहरानुसार अचूक दर पहायचे असतील तर इंडियन ऑयल ग्राहक RSP-डीलर कोड-92249 9 2249 वर,बीपीसीएल RSP-डीलर कोड- 9223112222 वर, एचपीसीएल ग्राहक HPPRICE-डीलर कोड- 9222201122 वर इथे मेसेज करू शकतो. तसेच ऑईल कंपन्यांच्या वेबसाईटवर म्हणजेच www.iocl.com, www.bharatpetroleum.com, www.hindustanpetroleum.com वर देखील दर पाहण्याची सोय आहे.