Petrol Pump | Representational Image | (Photo Credits: PTI)

Petrol-Diesel Price Today: गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आले. त्यानंतर आता शुक्रवारी तेलाच्या किंमती स्थिरावल्या आहेत. पण तरीही देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढलेल्याच आहेत. आज दिल्लीत पेट्रोलचे दर 101.54 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेलची किंमत 89.87 रुपये प्रति लीटर आहे. गुरुवारी पेट्रोलचे दर 35 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 15 पैसे प्रति लीटरने वाढले होते.(Ola-Uber Cab Rate : इंधन दरवाढीमुळे ओला, उबेरनं वाढवलं भाडं, जाणून घ्या नवे दर)

दरम्यान, 1 मे पासून ते आतापर्यंत पेट्रोल 10.35 रुपयांनी महागले आहे. दिल्लीत 1 मे रोजी पेट्रोलची किंमत 90.40 रुपये प्रति लीटर होती ती आता वाढून 101.54 रुपये प्रति लीटर झाली आहे. गेल्या 74 दिवसांमध्ये 11.14 रुपये प्रति लीटरने पेट्रोल वाढले गेले. तसेच डिझेलच्या किंमतीत गेल्या दोन महिन्यांमध्ये 9.14 रुपये प्रति लीटरने वाढ झाली आहे. 1 मे रोजी राष्ट्रीय राजधानीत डिझेल 80.73 रुपये प्रति लीटर होते ते आता वाढून 89.87 रुपये प्रति लीटरवर पोहचले आहे. तर जाणून घ्या दिल्ली, मुंबई, कोलकातासह तुमच्या शहरातील आजचे इंधन दर प्रति लीटरप्रमाणे.

>>दिल्ली

पेट्रोल- 101.54 रुपये, डिझेल- 89.87 रुपये

>>मुंबई

पेट्रोल-107.54 रुपये, डिझेल 97.45 रुपये

>> चेन्नई

पेट्रोल-101.77 रुपये, डिझेल-93.63 रुपये

>>कोलकाता

पेट्रोल-101.74 रुपये, डिझेल-93.02 रुपये

>>लखनौ

पेट्रोल-98.63 रुपये, डिझेल-90.26 रुपये

आजच्या इंधन दराबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही SMS च्या माध्यमातून पाहू शकता. त्याचसोबत HPCL ग्राहकांना HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस पाठवून सुद्धा इंधनाचे दर माहिती करुन घेऊ शकता.