Petrol, Diesel Price Today: दिल्ली वगळता देशातील सर्व शहरांतील पेट्रोल, डिझेल दर स्थिर, पाहा तुमच्या शहरातील इंधन भाव
Petrol, Diesel Prices Today | (Photo credit - File Manager)

केंद्र सरकारने उत्पादन शुल्क (Excise Duty) कमी केल्यापासून देशातील इंधन दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2021 या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) वरील उत्पादन शुल्क कपात केले. अनुक्रमे हे दर 5 आणि 10 रुपयांनी कमी केले होते. मात्र, त्यानंतर देशातील इंधन दर मात्र स्थिर झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मोठ्या उछालानंतर कच्चा तेल दरात घसरण पाहायला मिळाली. पाठिमागील महिन्यात प्रति बॅरल 85 डॉलर असलेले ब्रेंट क्रूड दरात पाठिमागील काही आठवड्यांमध्ये घसरण पाहायला मिळते आहे. ही घसरण प्रति बॅरल 70-72 डॉलरच्या आसपास आहे. आजपासून एक महिन्यांपूर्वी म्हणजेच 3 नोव्हेंबरला क्रूड प्रति बॅरल 70 डॉलरवर पोहोचले होते.

आंतरराष्ट्रीय तेल बाजारात काल क्रूडचा दर प्रति बॅरल 70 डॉलर होता. त्यानंतर एक आठवड्यात हाच दर प्रति बॅरल 79 डॉलर झाला. हेच क्रूड वायदा बाजारात 2.99% तेजीसह 70.45 डॉलर प्रति बॅरल पोहोचला. स्थानिक बाजारातील इंधन दराबाबत पाहिले तर राजधानी दिल्लीत गुरुवारी (2 डिसेंबर) पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त विकले जात होते. दिल्ली हे सध्या देशातील एकमेवर शहर आहे. ज्या ठिकाणी पेट्रोल 100 रुपयांच्याही आतमध्ये आहे. जाणून घ्या देशातील प्रमुख शहरांतील इंधन दर. (हेही वाचा, Impact of Excise Duty Reduction: पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कपातीचा काय होणार परिणाम? केंद्रावर किती पडणार बोजा, जनतेचा किती फायदा?)

देशातील प्रमुख शहरांती पेट्रोल,डिझेल दर

दिल्ली:

पेट्रोल – ₹95.41 प्रति लीटर

डिझेल - ₹86.67 प्रति लीटर

मुंबई:

पेट्रोल – ₹109.98 प्रति लीटर

डिझेल – ₹94.14 प्रति लीटर

कोलकाता:

पेट्रोल – ₹104.67 प्रति लीटर

डिझेल – ₹89.79 प्रति लीटर

चेन्नई:

पेट्रोल – 101.40 रुपये प्रति लीटर

डिझेल – ₹91.43 प्रति लीटर

नोएडा:

पेट्रोल – ₹95.51 प्रति लीटर

डिझेल – ₹87.01 प्रति लीटर

भोपाल:

पेट्रोल – ₹107.23 प्रति लीटर

डिझेल – ₹90.87 प्रति लीटर

बेंगलुरु:

पेट्रोल – ₹100.58 प्रति लीटर

डिझेल – ₹85.01 प्रति लीटर

लखनऊ:

पेट्रोल- 95.28 रुपये प्रति लीटर

डिझेल - 86.80 रुपये प्रति लीटर

चंडीगढ:

पेट्रोल – ₹94.23 प्रति लीटर

डिझेल – 80.90 रुपये प्रति लीटर

देशातील पेट्रोल, डिझेल दर प्रतिदिन बदलत राहतात. आपण केवळ एका SMS च्या माध्यमातूनही पेट्रोल, डिझेलचे आपल्या शहरातील दर जाणून घेऊ सकता. यासाठी आपण इंडियन ऑलय मेसेज सेवेच्या माध्यमातून 9224992249 या मोबाईल क्रमांकावर SMS पाठवू शकता. त्यासाठी मेसेज बॉक्समध्ये लिहा '- RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलर कोड'. आपल्या परिसरातील RSP आपण इंडियन ऑयलच्या वेबसाईटवर जाऊन तापसू शकता. मेसेज पाठवताच आपल्या मोबाईल क्रमांकावर पेट्रोल, डिझेलचे ताजे भाव पाहायला मिळतील.