डिझेल (Diesel ) ग्राहक सलग तिसऱ्या दिवशी दिलासा मिळवताना दिसत आहेत. हे भाग्य मात्र पेट्रोल (Petrol) ग्राहकांच्या वाट्याला येताना दिसत नाही. देशात शुक्रवारी (20 ऑगस्ट 2021) डिझेल दरात पुन्हा एकदा 20 पैशांची घट झाल्याचे पाहायला मिळाले. पाठीमागील दोन दिवसांपासून डिझेल दरात (Diesel Price) केवळ 20 पैशांचीच कपात होत आहे. त्यामुळे पाठीमागील तीन दिवसांमध्ये डिझेल 60 पैशांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोल दर (Petrol Price) मात्र पाठीमागील 34 दिवसांपासून 'जैसे थे' स्थितीत आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा चढ उतार पाहायला मिळत नाही. जाणून घ्या भारतातील प्रमुख शहरांतील इंधन दर (Fuel Rates).
तेल अभ्यासक सांगतात की जेव्हा या महिन्यात कच्चा तेलांच्या दरांमध्ये काहीशी घट पाहायला मिळते आहे. त्यामुळेच डिझेलचेही भाव काहीसे उतरु पाहात आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये कच्चा तेलांच्या दरांमध्ये 9% घट झाली आहे. आता गुरुवारी आंतराष्ट्रीय तेल बाजारात डिझेल दरात 166 रुपयांची घट होऊन तो 4,708 रुपये प्रति बॅरल इतकी झाली आहे.
जागतिक पातळीवर न्यूयॉर्कयेथे वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्चा तेलाचे दर 3.36% घसरणीसह 63.26 डॉलर प्रति बॅरल इतके राहिले आहेत. जागतिक मानक मानल्या जाणाऱ्या ब्रेंट क्रूड दरात 3.05% घट होऊन तो दर 66.15 डॉलर प्रति बॅरल इतका राहिला आहे. (हेही वाचा, Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीला काँग्रेसच जबाबदार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांचे वक्तव्य)
देशातील प्रमुख शहरांतील पेट्रल-डिझेल दर
दिल्ली
पेट्रोल - ₹101.84 प्रति लीटर
डिझेल - ₹89.27 प्रति लीटर
मुंबई:
पेट्रोल – ₹107.83 प्रति लीटर
डिझेल – ₹96.84 प्रति लीटर
कोलकाता:
पेट्रोल – ₹102.08 प्रति लीटर
डिझेल – ₹92.32 प्रति लीटर
चेन्नई:
पेट्रोल – 99.47 रुपये प्रति लीटर
डिझेल – ₹93.84 प्रति लीटर
बेंगलुरु:
पेट्रोल – ₹105.25 प्रति लीटर
डिझेल – ₹94.65 प्रति लीटर
भोपाल:
पेट्रोल – ₹110.20 प्रति लीटर
डिझेल – ₹98.05 प्रति लीटर
लखनऊ:
पेट्रोल- 98.92 रुपये प्रति लीटर
डिझेल - 89.61 रुपये प्रति लीटर
पटना:
पेट्रोल – ₹104.25 प्रति लीटर
डिझेल – ₹95.01 प्रति लीटर
चंडीगढ़:
पेट्रोल – ₹97.93 प्रति लीटर
डिझेल – ₹88.93 रुपये प्रति लीटर
देशातील प्रत्येक पेट्रल पंपावर दररोज सकाळी 6 वाजता नवे दर लागू होतात. कारण प्रत्येक ठिकाणचे स्थानिक महसूली कर वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात अनेकदा पेट्रोल डिझेल तर वेगवेगळे असू शकतात. आपण पेट्रोल-डिझेलचे आपल्या प्रदेशातील दर SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला इंडियन ऑयल SMS सेवेच्या माध्यमातून मोबाइल नंबर 9224992249 वर SMS पाठवू शकता. त्यासाठी आपला मेसेज असा लिहायला हवा. RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलर कोड. आपल्या परिसरातील RSP साईटवर जाऊन तपासू शकता. हा मेसेज पाठवल्यानंतर काही सेकंदात आपल्या फोनवर ताजे पेट्रोल, डिझेल दर उपलब्ध होऊ शकतात.