Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे इंधनाचे दर
Petrol Price In India | Representational Image | (Photo Credits: PTI)

Petrol Diesel Price: सरकारी तेल कंपन्यांकडून आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. देशातील इंधनच्या किंमतीने आता उच्चस्तर गाठला आहे. आज दिल्लीत पेट्रोलचे दर 99.51 रुपये तर डिझेलचे दर 89.36 रुपये प्रति लीटर झाले आहे. मुंबईत पेट्रोल 105.58 रुपये प्रति लीटर आणि डिझेलच 96.91 रुपये प्रति लीटर झाले आहे. कोलकाता येथे पेट्रोल 92.27 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 99.45 रुपये प्रति लीटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल93.91 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 100.44 रुपये प्रति लीटर झाले आहे.

प्रत्येक दिवशी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतो. त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू केले जातात. या मध्ये एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि अन्य गोष्टींचा समावेश करुन पेट्रोल-डिझेलचे दर जवळजवळ दुप्पट होतात. याच सोबत आंतराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत त्याच्या आधारावर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतो.(7th Pay Commission Update: केंद्रीय मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळात पदोन्नतीबाबत चर्चा सुरू, लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता)

Tweet:

आजच्या इंधन दराबद्दल तुम्हाला जर जाणून घ्यायचे असल्यास तुम्ही SMS च्या माध्यमातून पाहू शकता. त्याचसोबत HPCL ग्राहकांना HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस पाठवून सुद्धा इंधनाचे दर माहिती करुन घेऊ शकता.

 या आठवड्यात OPEC देशांची बैठक पार पडली. या आगामी ऑगस्ट  ते डिसेंबर दरम्यान कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्यासंदर्भात निर्णय होणार आहे. मात्र 11 तास चाललेल्या बैठकीनंतर सुद्धा कोणताही निर्णय झाला नाही. यामुळे कच्च्या तेलाच्या बाजारात निराशाजनक स्थिती निर्माण झाली. शुक्रवारी बाजार बंद होण्यावेळी ब्रेंट क्रूड (Brent Crude) 76.17 डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावला होता. जो एका दिवसापूर्वी 0.33 डॉलर अधिक आहे. याच प्रमाणे युएस वेस्ट टॅक्सास इंटरमीडियएट किंवा डब्लूटीआय क्रूड (WTI Crude) 0.07 डॉलरने घटत 75.16 डॉलर प्रति बॅरलवर बंद झाला होता.