प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Petrol-Diesel Price Hike Today: निवडणूका संपल्यानंतर आता सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री पडली आहे. कारण आज (4 मे) शासकीय तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. गेल्या 18 दिवसांमध्ये तेलाच्या किंमतीत कोणताच बदल झाला नव्हता. 66 दिवसानंतर पहिल्यांदाच असे झाले असून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 15-20 पैसे प्रति लीटरने वाढ झाली आहे. किंमती वाढल्यानंतर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मंगळवारी पेट्रोल 90.55 रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेल 81 रुपये प्रति लीटरने विक्री केले जात आहे.

यापूर्वी 66 दिवसांपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली नव्हती. मात्र निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर बहुतांश वेळा इंधनाच्या किंमती हलक्या स्वरुपात खाली आणल्या होत्या. तर गेल्या 16 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलमध्ये कोणताच बदल केला नव्हता. अखेर 15 एप्रिलला पेट्रोल 16 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 14 पैसे प्रति लीटर स्वस्त झाले होते. त्यानंतर किंमती सातत्याने स्थिर होत्या. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर.( हेही वाचा-Bank Holidays in May 2021: मे महिन्यात 'या' तारखांच्या दिवशी बँकांना राहणार सुट्टी; संपूर्ण यादी जाणून घ्या)

>दिल्ली- पेट्रोल 90.55 रुपये आणि डिझेल 80.91 रुपये प्रति लीटर

>>मुंबई- पेट्रोल 96.95 रुपये आणि डिझेल 87.98 रुपये प्रति लीटर

>>चेन्नई- पेट्रोल 92.55 रुपये आणि डिझेल 85.90 रुपये प्रति लीटर

>>कोलकाता- पेट्रोल 90.76 रुपये आणि डिझेल 83.78 रुपये प्रति लीटर

>>लखनौ- पेट्रोल 88.84 रुपये आणि डिझेल 81.31 रुपये प्रति लीटर

>>चंदीगढ- पेट्रोल 87.15 रुपये आणि डिझेल 80.92 रुपये प्रति लीटर

देशातील तीन तेल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC कडून रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले जातात. नव्या दरांसाठी तुम्ही या कंपन्यांच्या वेबसाइट्सला भेट देऊ शकता. या व्यतिरिक्त फोनवरुन SMS च्या माध्यमातून सुद्धा दर तपासून पाहू शकता. तर 92249 92249 या क्रमांकावर SMS पाठवून पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही जाणून घेऊ शकता.