Bank Holidays in May 2021: मे महिन्यात 'या' तारखांच्या दिवशी बँकांना राहणार सुट्टी; संपूर्ण यादी जाणून घ्या
Bank Holiday | Representational Image (Photo Credits: PTI)

Bank Holidays in May 2021: कोरोना साथीच्या काळात आपण आपले बँकिंग काम ऑनलाइन माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु, अनेकदा ग्राहकांना चेक क्लिअरन्स आणि कर्जाशी संबंधित सेवांसह विविध कामांसाठी बँक शाखेत जावे लागते. अशा परिस्थितीत आपल्याला हे माहित असले पाहिजे की, ज्या दिवशी आपल्यास आपल्या बँकिंगच्या कामासाठी बँकेत जावे लागेल, त्या दिवशी बँकांना सुट्टी आहे किंवा नाही. बँकेला सुट्टी असल्यास तुम्हाला विनाकारण बँकेत फेऱ्या माराव्या लागतील. या महिन्यातील कोणत्या तारखांना म्हणजेचं मे 2021 रोजी बँक बंद असतील ते जाणून घ्या. (वाचा - Bank Holidays in Year 2021: नववर्षात किती मिळणार सुट्ट्या आणि Long Weekends; येथे पहा संपूर्ण यादी)

1 मे 2021: या दिवस कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे. यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, तेलंगणा, मणिपूर, केरळ, गोवा आणि बिहारमध्ये बँकांना सुट्टी असेल.

2 मे, 2021:  रविवारमुळे बँकांना सुट्टी असेल.

7 मे 2021: या दिवशी जुमातुल विदा आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये बँकांना सुट्टी असेल.

8 मे 2021: दुसरा शनिवार असल्याने बँकांना या दिवशी सुट्टी असेल.

9 मे 2021: या दिवशी रविवारी असल्याने बँकांना आठवड्याचे सुट्टी असेल.

13 मे 2021: या दिवशी ईद-उल-फितर आहे. यामुळे महाराष्ट्र, जम्मू, काश्मीर आणि केरळमधील बँकांना सुट्टी असेल.

14 मे 2021: या दिवशी भगवान परशुराम जयंती आहे. तसेच रमजान-ईद आणि अक्षय तृतीया आहे. या दिवशी महाराष्ट्र, जम्मू, केरळ आणि काश्मीरशिवाय संपूर्ण देशात बँकांना सुट्टी असेल.

16 मे 2021: या दिवशी रविवार असल्याने बँकांना आठवड्याची सुट्टी असेल.

22 मे 2021: या दिवशी चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.

23 मे 2021: या दिवशी रविवारी असल्याने बँकांना आठवड्याची सुट्टी असेल.

26 मे 2021: या दिवशी बुद्ध पौर्णिमा आहे. यामुळे त्रिपुरा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये बँकांना सुट्टी असेल.

30 मे, 2021: या दिवशी रविवारी असल्याकारणाने बँकांना आठवड्याची सुट्टी असेल.

अशा प्रकारे मे महिन्यात वरील तारखांच्या दिवशी बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे या तारखांची नोंद घेऊन तुम्ही आपले बँक काम पूर्ण करू शकता.