![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/09/Petrol-Diesel-Price-380x214.jpg)
पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) ग्राहकांसाठी दिलासादायक वृत्त आहे. आज म्हणेच 12 नोव्हेंबर पेट्रोल-डिझेल दर (Petrol-Diesel Rate) स्थिर आहेत. त्यात कोणताही बदल झाला नाही. उल्लेखनिय असे की, हा सलग आठवा दिवस आहे. पेट्रोल-डिझेल दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम पदार्थांवरील उत्पादन शुल्क (Excise Duty) कमी केले. त्यानंतर देशातील इतरही अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केले. त्यामुळे सहाजिकच पेट्रोल-डिझेलच्या किमती उतरल्या. त्यानंतरही ऑइल मार्केटींग कंपन्यांनी इंधन दरात ( Fuel Rate) कोणतेही बदल केले नाहीत. कपाच होऊनही दिल्ली, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल प्रति लिटीर शंभर रुपयांच्या वरच आहे.
आंतरराष्टीय तेल बाजाराकडे पाहायचे तर गुरुवारी जागतीक मान्यता असलेले ब्रेंट क्रुड 0.77% वाढून 83.28 डॉलर प्रति बॅरल झाले होते. वायदे बाजारात कच्चा तेलाची किमत सात रुपयांच्या तेजीसह 6,079 रुपये प्रति बॅरल झाली होती. जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्चा तेलाचा दर 8.84% तेजीसह 82.02 डॉलर प्रति बॅरल झाला. (हेही वाचा, Impact of Excise Duty Reduction: पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कपातीचा काय होणार परिणाम? केंद्रावर किती पडणार बोजा, जनतेचा किती फायदा?)
पेट्रोल, डिझेल दर
दिल्ली:
पेट्रोल – ₹103.97 प्रति लीटर
डिझेल - ₹86.67 प्रति लीटर
मुंबई:
पेट्रोल – ₹109.98 प्रति लीटर
डिझेल – ₹94.14 प्रति लीटर
कोलकाता:
पेट्रोल – ₹104.67 प्रति लीटर
डिझेल – ₹89.79 प्रति लीटर
चेन्नई:
पेट्रोल – 101.40 रुपये प्रति लीटर
डिझेल – ₹91.43 प्रति लीटर
नोएडा:
पेट्रोल – ₹95.51 प्रति लीटर
डिझेल – ₹87.01 प्रति लीटर
भोपाल:
पेट्रोल – ₹107.23 प्रति लीटर
डिझेल – ₹90.87 प्रति लीटर
बेंगलुरु:
पेट्रोल – ₹100.58 प्रति लीटर
डिझेल – ₹85.01 प्रति लीटर
लखनऊ:
पेट्रोल- 95.28 रुपये प्रति लीटर
डिझेल - 86.80 रुपये प्रति लीटर
चंडीगढ:
पेट्रोल – ₹94.23 प्रति लीटर
डिझेल – 80.90 रुपये प्रति लीटर
देशातील पेट्रोल, डिझेल दर प्रतिदिन बदलत राहतात. आपण केवळ एका SMS च्या माध्यमातूनही पेट्रोल, डिझेलचे आपल्या शहरातील दर जाणून घेऊ सकता. यासाठी आपण इंडियन ऑलय मेसेज सेवेच्या माध्यमातून 9224992249 या मोबाईल क्रमांकावर SMS पाठवू शकता. त्यासाठी मेसेज बॉक्समध्ये लिहा '- RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलर कोड'. आपल्या परिसरातील RSP आपण इंडियन ऑयलच्या वेबसाईटवर जाऊन तापसू शकता. मेसेज पाठवताच आपल्या मोबाईल क्रमांकावर पेट्रोल, डिझेलचे ताजे भाव पाहायला मिळतील.