Petrol-Diesel Price Hike (Photo Credits: File Photo)

तेल कंपन्यांनी आज (21 मे) पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. दिल्लीत पेट्रोल 93.04 रुपये प्रति लीटर आहे तर मुंबई (Mumbai) मध्ये हाच दर 99.32 रूपये प्रति लीटर आहे. कोलकत्त्यातही (Kolkata) आज पेट्रोलचे दर 1 रूपया 19 पैशांनी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे कोरोना संकटाचा सामना करणार्‍या सामान्यांवर आता या इंधन दरवाढीचा देखील फटका बसणार आहे. काल (20 मे) पेट्रोल -डिझेलच्या दरांमध्ये (Petrol and Diesel Price) कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. त्यामुळे इंधनाचे दर हे बुधवार प्रमाणेच कायम होते.

आजच्या दरांनुसार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलचे दर 90 दीच्या पार गेले आहेत. मुंबई मध्ये सर्वाधिक प्रति लीटर पेट्रोलचा दर 99.32 रूपये आहे तर दिल्लीत 93.04 रूपये आहे. चैन्नई मध्ये हेच दर 94.71 रूपये आहेत तर कोलकत्ता मध्येप्रति लीटर साठी 93.11 रूपये मोजावे लागत आहेत. पेट्रोल प्रमाणे डिझेलची देखील हीच परिस्थिती आहे. आज मुंबईत डिझेलचा दर 90.71 रूपये, दिल्लीत 83.80 , चैन्नई मध्ये 88.62 तर कोलकत्ता मध्ये 86.35 रूपये आहे.

भारतातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर

दरम्यान 2 ते 20 मे मध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये 2 रूपये 48 पैसे यांनी वाढलं आहे तर डिझेल 2 रूपये 78 पैसे यांनी वाढलं आहे. भारतात अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर प्रति लीटर 100 रूपयांच्या पार गेला आहे.

भारतात इंधनाचे दर हे आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि क्रुड ऑईलच्या दरांवर अवलंबून असतात. ऑईल मार्केटिंग कंपन्या दररोज सकाळी 6 च्या सुमारास त्याचे दर जाहीर करतात. मग त्यावर इतर टॅक्स, कमिशन यांचे दर आकारल्यानंतर अंतिम भाव शहरानुसार वेगळावेगळा असतो.