कॉल ड्रॉप (Call Drops) समस्येला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. सातत्याने झालेल्या कॉल ड्रॉपसाठी भारतीय दूरसंचार निगम (BSNL), आयडिया सेल्युलर (Idea Cellular) या कंपन्यांसह इतरही सर्व्हिस प्रोव्हायरर्सना सरकारने 58 लोख रुपयांचा दंड ठोठावला आहे. दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
सिन्हा यांनी सांगितले की, कॉल ड्रॉप संबंधी देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल जून 2018 ला संपलेल्या तिमाहीदरम्यान, बीएसएनएलला चार लोख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर, आयडीया कंपनीला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यांना सांगितले की, मार्च 2018मध्ये संपलेल्या तिमाही दरम्यान बीएसएनएल, आयडीया, टाटा आणि टेलीनॉरवरही दंड लावण्यात आला. (हेही वाचा, आता Number Portability होणार फक्त दोन दिवसांत; ट्रायने दिले नवे आदेश)
सर्व्हिस प्रोव्हायडर्सवर हा दंड भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)ने आकारला आहे. सिन्हा यांनी पुढे सांगितले की, मुलभूत कक्षेत सुधारणा झाली आहे. त्यामुळे आता सर्व्हिस प्रोव्हायडर्स कंपन्यांच्या सेवांवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. काही ठिकाणी रेडिएशनची शक्यात व्यक्त करत मोबाईल टॉवर लावण्यास विरोध केला जातो. त्यामुळेही अशा समस्या निर्माण होत असल्याचे कंपन्यांकडून सांगितले जाते.