Pathankot:पाठणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर लष्करी वर्दीतील चार संशयितांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच हिमाचल प्रदेशाची ही नंबरप्लेट असलेली गाडीसुद्धा जप्त करण्यात आली आहे.
पाठणकोट- जालंधर राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदी चालू असताना चार जणांना पंजाब (Punjab) पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मदचे काही दहशतवादी पंजाबच्या दिशेने अमृतसर येथे आले असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती.
तर अमृतसरमध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यानंतर पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था कडक ठेवण्यात आली होती. तसेच 2017 मध्ये काही दहशतवाद्यांनी लष्काराच्या एअरबेवर हल्ला केला होता. त्यावेळी 7 जवान शहीद झाले होते.