Patanjali | Photo Credits: Twitter/ ANI and Facebook

कोव्हिड19 विरूद्ध रामबाण आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा करण्यात आला. मात्र आता हा दावा वादामध्ये अडकला आहे. काल कोविड 19 वर कोरोनिल हे औषध प्रभावी असल्याचं योग गुरू बाबा रामदेव यांनी सांगितलं आहे. आयुष मंत्रालयानेदेखील आम्ही रिपोर्ट्स पाहून त्याला अनुमती देण्याबाबत निर्णय देऊ असं सांगितलं होतं. आता आज (24 जून) उत्तराखंड आयुर्वेद डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, बाबा रामदेव यांच्या पतंजलि कंपनीने सादर केलेल्या रिपोर्ट्सनुसार त्यांनी खोकला, ताप आणि इम्युनिटी बुस्टर साठी परवानगी मागितली होती त्यामध्ये कोरोना वायरसचा उल्लेख नाही.

ANI वृत्तसंस्थेशी बोलताना उत्तराखंड आयुर्वेद डिपार्टमेंटच्या लायासंस ऑफिसरने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पतंजलि विरुद्ध नोटिस जारी केलेली आहे. त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार आम्ही लायसंस दिले आहे त्यामध्ये कोरोना वायरस, कोव्हिड 19 चा उल्लेख नाही. पतंजलि च्या COVID 19 वरील औषधांवर आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची प्रतिक्रिया; पहा काय म्हणाले?

ANI Tweet

आज आयुर्वेद डिपार्टमेंट नोटिस पाठवून त्यांना लायसंस कुणी दिले याची विचारणा करणार आहे. आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी देखील आधी रिपोर्ट पाहिला जाईल. त्यानंतरच परवानगी दिली जाईल अशी माहिती दिली आहे. तसेच कालपासूनच कोरोनिल, श्वासारी वटी या औषधांच्या जाहिरातीआयुष मंत्रालयाकडून थांबवण्यात आल्या होत्या.