पतंजलि च्या COVID 19 वरील औषधांवर आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची प्रतिक्रिया; पहा काय म्हणाले?
Shripad Naik (Photo Credits-ANI)

योग गुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी पतंजलि आयुर्वेद कडून काल (23जून) कोरोनावर रामबाण उपाय म्हणून श्वासारी वटी, कोरोनिल अशी औषध शोधण्याचा दावा केला आहे. त्यानंतर काही तासांतच त्याची देशभर चर्चा झाली. आयुष मंत्रालयाकडूनदेखील जाहिरात थांबवण्याचे तात्काळ आदेश देत क्लिनिकल ट्रायल्सचे रिपोर्ट देण्याचे आदेश देण्यात आहे. आज आयुष मंत्रालयाचे मंत्री श्रीपाद नाईक (Shripad Naik) यांनी बाबा रामदेव यांच्या औषधांवर प्रतिक्रिया देताना म्हणाले,"बाबा रामदेव यांनी देशाला नवी औषधं दिली ही चांगली गोष्ट आहे परंतू नव्या औषधांच्या मान्यातांना कही नियम आहे. आयुष मंत्रालयाला त्याची माहिती देणं आवश्यक आहे. पतंजलि कडून रिपोर्ट देण्यात आला आहे , आम्ही त्याची पडताळणी करू. त्यानंतरच औषधाला परवानगी द्यायची की नाही? हे ठरेल."

दरम्यान काल बाबा रामदेव यांनी हरिद्वार मध्ये पतंजलि योगपीठामध्ये डॉक्टर्स, संशोधक टीम सह पत्रकार परिषद घेत कोरोनावरील औषधं लॉन्च केली. त्यावेळेस कोरोनाचे 69 रूग्ण 3 दिवसांत 100% कोरोनामुक्त झाले. तसेच एकाही रूग्णाचा मृत्यू न होता उर्वरित रूग्ण 7 दिवसांत बरे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. रात्री उशिरा पतंजलि चे सीईओ आचार्य बालकृष्ण यांनीदेखील ट्वीट करत त्याबाबतचा खुलासा केला आहे. Coronil: कोव्हिड 19 वर पतंजलि कडून आयुर्वेदिक औषध, 3 दिवसांत 69% रूग्ण बरे होत असल्याचा बाबा रामदेव यांचा दावा.

ANI Tweet

पतंजलि चे सीईओ आचार्य बालकृष्ण यांचे ट्वीट

दरम्यान आचार्य बालकृष्ण यांच्या ट्वीटनुसार, सरकार आयुर्वेदाला प्रोत्साहन देणारं आहे. सरकार सोबत काही कम्युनिकेशन गॅप होता तो दूर झाला आहे. Randomised Placebo Controlled Clinical Trials चे जितके स्टॅडर्ड पॅरामीटर्स आहेत तितके 100% पूर्ण केले आहेत. तसेच त्याची माहिती आयुष मंत्रालयाला दिल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.