जेट एअरवेअच्या एका चुकीमुळे प्रवाशाला कायमचा बहिरेपणा
जेट एअरवेज विमान ( फोटो सौजन्य )

जेट एअरवेजमध्ये दोन महिन्यांपूर्वी एक धक्कादायक प्रकार घडला होता. त्यावेळी विमानातील कर्मचारी हवेचा दाब नियंत्रण करणारा स्विच चालू करण्यास विसरुन गेला होता. त्यामुळे विमानातील प्रवाशांच्या नाकातून आणि कानातून रक्त येण्यास सुरुवात झाली होती.

या घटनेत सापडलेला मुकेश शर्मा मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या विमानातून प्रवास करत होता. हवेचा दाब नियंत्रित न राहिल्याने त्याच्या कानातून रक्त येण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर मुकेशला बहिरेपण आले असल्याचे ऑडिओमेट्री या टेस्टमधून कळले. तसेच मुकेशचा उजवा कान हा बहिरा झाला असून त्याला समोरच्या व्यक्तीशी बोलताना अडथळा निर्माण होत आहे.

तर मुकेश हा पोर्तुगालच्या एव्हीरिओ विद्यापीठात पीएचडी रिसर्चर म्हणून काम करतो. तसेच फोन आल्यास तो डाव्या कानाला लावल्यास त्याला हळू ऐकायला येत असल्याचे मुकेशने सांगितले आहे.