Parliament Employees New Dress Code | (Photo credit: ANI)

Parliament special session: संसद कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने बोलावलेल्या येत्या विशेष अधिवेशनापासून नवीन गणवेश (Parliament Employees New Uniforms) मिळणार आहे. जो सध्या देशभर टीकेचा विषय ठरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या 18 सप्टेंबरपासून संसदेचे कामकाज नव्या इमारतीमधून होणार आहे. त्यामुळे नव्या इमारतीत कर्मचाऱ्यांना नवा गणवेश मिळणार आहे. महत्त्वाचे असे की, ‘इंडियन टच’ असलेल्या, नवीन गणवेशात ‘नेहरू जॅकेट’ आणि खाकी रंगाची पँट असेल. नवीन ड्रेस कोड संसदेच्या दोन्ही सभागृहात लागू होणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) ने हा गणवेश तयार केला आहे.

इंडिया टुडे दिलेल्या वृत्तानुसार संसदेतील नोकरशाहा, अधिकारी यांच्या गळाबंद सूटला नेहरु जॅकेटने बदलले जाईल. त्यांचे शर्टसुद्धा कमळाच्या फुलांची नक्षी असलेले असेल. तर सर्वसाधारण कर्मचारी खाकी रंगाची पँट घातलील.

ट्विट

द हिंदू बिझनेसलाइनने दिलेल्या वृत्तात असे म्हटले आहे की, नवीन ड्रेस कोडमध्ये वेगवेगळ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी पोशाख वेगळे केले जाईल. पूर्वी सर्वजण एकसमान सफारी सूट घालायचे. आता, संसद सुरक्षा सेवा (ऑपरेशन्स) वेगळ्या पोशाखात असतील. ते त्यांचे जुने निळ्या रंगाचे सफारी सूट सोडून देतील आणि आर्मी कॅमफ्लाज पॅटर्नच्या पोषाखात दिसतील. मार्शल मणिपुरी पगडी किंवा कन्नड पगडी परिधान करतील. महिला कर्मचाऱ्यांना नवीन डिझाइनच्या साड्या मिळणार आहेत.

ट्विट

दरम्यान, लोकसभेतील काँग्रेसचे व्हिप माणिकम टागोर यांनी कर्मचाऱ्यांच्या पोषाखावर केवळ कमळाचीच नक्षी का? आपले राष्ट्रीय पक्षी, प्राणी वाघ किंवा मोर अथवा इतर संकल्पनेची डिझाईन का नाही? केवळ कमळच का? असा सवाल उपस्थित केला आहे.

ट्विट

दरम्यान, 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 31 ऑगस्ट रोजी केली होती. भारताचे नाव बदलून भारत असा ठरावही या अधिवेशनात केंद्राकडून आणला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे.