Smriti Irani (Photo Credit-ANI Twitter)

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) (वय 63) यांचे निधन झाले. रविवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पर्रिकर यांच्या निधनानंतर विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पर्रिकरांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकारण आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर गोव्यात दाखल झाले आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इरणी (Smriti Irani) यासुद्धा पर्रिकरांना निरोप देण्यासाठी गोव्यात पोहोचल्या आहेत. पर्रिकरांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचलेल्या स्मृतींना पर्रिकरांच्या निधनाचे दुख: आवरता आले नाही.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी (Ramnath Kovind) ट्विटर करुन पर्रिकर यांच्या निधाची माहिती दिली होती. पँक्रियाटिक कॅन्सर या अजाराने पर्रिकर हे गेले वर्षभर आजारी होती. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पर्रिकर यांच्या निधनानंतर 18 मार्च या दिवशी केंद्र सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. पर्रिकर यांचे पार्थीव पणजी येथील भाजप कार्यालयासमोर अंतिम दर्शनासाठी ठेवले आहे. आज दुपारी चारनंतर पर्रिकर यांची अंत्यायात्रा निघणार आहे. (हेही वाचा, गोवा: मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवाचे नरेंद्र मोदी यांनी घेतले अंतिम दर्शन, मिरामार बीच वर होणार अंतिम संस्कार)

पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी यांच्याह अनेक मंत्री आणि मान्यवर नेते गोव्यात पोहोचले आहेत. पंतप्रधानांनी पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहीली आणि पर्रिकरांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.