बालाकोट स्ट्राईक नंतर भारतीय विमानांसाठी बंद केलेली हवाई हद्द पाकिस्तानने उघडली, Air India ला दिलासा
Airlines (Representational Image)

बालाकोट हवाई हल्ल्यानंतर  (Balakot Air Strike) भारतीय विमानांसाठी बंद ठेवण्यात आलेली हवाई हद्द पाकिस्तानने (Pakistan)  आज, म्हणजेच 16 जुलैच्या सकाळी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटी (Pakistan Civil aviation Authority)  तर्फे जाहीर करण्यात आलेल्या नोटिस नुसार सर्व देशातील नागरिकांच्या वाहतुकीसाठी हवाई मार्ग खुला करणार आहे. पाकिस्तानने बालाकोटमधील दहशतवादी हल्ल्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी ही संपूर्ण हवाई हद्द बंद केली होती. या बंदीमुळे मागील काही महिन्यात एअर इंडियाला (Air India) तब्बल 491 कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. पाकची हवाई हद्द बंद असल्यामुळे भारताच्या विमानांना दुसऱ्या वळणाने अधिक काळ प्रवास करावा लागत होता, मात्र आता घेतलेल्या या निर्णयाने काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तानने सर्व विमान कंपन्यांना आज दुपारी 12 वाजून 41 मिनिटांनंतर आपल्या हद्दीतून प्रवास करण्यास अनुमती दिली आहे.तुर्तास या प्रकरणी संपूर्ण माहिती मिळवून येत्या २-३ दिवसात विमानांच्या वाहतूकमार्गात बदल केले जातील अशी प्रतिक्रिया एअर इंडियाने दिली आहे.  बालाकोट हल्ल्यावेळी 300 फोन 'ऍक्टिव्ह'; टेक्निकल टीमने केला होता सर्व्हेलन्स, त्यानंतरच झाला हल्ला

ANI ट्विट 

Air India ट्विट 

दरम्यान, मागील अडीच महिन्यांपासून ही बंदी हटवण्यासाठी जागतिक स्तरावर विविध प्रयत्न होत होते, मात्र, याप्रकरणी निर्णयाला गती मिळत नव्हती. याविषयी पाकिस्तानचे हवाई वाहतूक मंत्री गुलाम सरवर खान यांनी, या बंदीमुळे भारताचे मोठे नुकसान होत असले तरी पाकिस्तानचे मात्र कमी नुकसान होत असल्याचा दावा केला होता तर 'आम्हाला या संघर्षाच्या वाटेवर जायचे नाही. आम्ही भारताशी सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास तयार आहोत,' असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते महंमद फैजल यांनी म्हटले होते.