पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) संघाई कॉर्पोरेशन ऑर्गनाईझेशन (SCO) च्या शिखर संमेलनाला उपस्थिती लावणार आहे. तत्पूर्वी मोदी यांनी या संमेलनाला जाण्यासाठी पाकिस्तानच्या (Pakistan) हवाई हद्दीतून जावे लागणार आहे. त्यासाठी आता पाकिस्तानने मोदी यांच्या विमानासाठी हवाई हद्दीतून जाण्यासाठी मार्ग खुला करुन दिला आहे.
13 जून रोजी नरेंद्र मोदी बिश्केकला जाणार आहे. त्यामुळे बिश्केकला जाण्यासाठी पाकिस्तानच्या हद्दीतून जावे लागते असे एका केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. मात्र बालकोट येथे भारतीय जवानांनी केलेल्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानने त्यांची हवाई हद्द बंद केली होची. परंतु मोदी यांच्या विमानाला येथून जाण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून परवानगी मागितली होती. त्यामुळे पाकिस्तानने या परवानगीला मान्यता दिली आहे.(इमरान खान यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र)
यापूर्वी 21 मे रोजी सुषमा स्वराज यांच्यासाठी पाकिस्तान मार्गे हवाई हद्दीतून जाण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. तर येत्या काही काळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील शांतता प्रस्थापित होण्यासाठी ही महत्वाची भुमिका ठरेल असे म्हटले जात आहे.