SpiceJet | (Photo Credits: Twitter/ANI)

जम्मू कश्मीर मधील पहलगाम च्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) आता स्पाईस जेट (SpiceJet) कडून श्रीनगर (Srinagar) कडे येणार्‍या-जाणार्‍या पर्यटकांना विमानकंपनीने दिलासा दिला आहे. स्पाईसजेटने आता 30 एप्रिल पर्यंत तिकिट रद्द करणं, रिशेड्युल करणं मोफत असेल अशी माहिती दिली आहे. मात्र ही सूट ज्यांनी तिकीटं 22 एप्रिल किंवा त्याच्यापूर्वी काढली आहेत त्यांच्यासाठीच लागू असेल अशी माहिती दिली आहे. यासोबतच आज स्पाईसजेट कडून श्रीनगर-दिल्ली विशेष विमान देखील चालवलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सध्या जम्मू कश्मीर मध्ये असलेल्या अनेक पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेकांनी आपली ट्रीप रद्द करत माघारी परतण्याचा निर्णय घेतला आहे. शक्य असलेल्या पर्यायी मार्गांनी सध्या प्रवासी परतत आहेत अशामध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या श्रीनगर मधून अन्य भागात जाणार्‍या विमानसेवा वाढवल्या जात आहेत. Pahalgam Terror Attack: कश्मीर मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार कडून विशेष विमानाची सोय; 6 मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर .

स्पाईसजेट कडून प्रवाशांना दिलासा 

स्पाईस जेटच्या आधी एअर इंडिया कडूनही श्रीनगर ते दिल्ली आणि श्रीनगर ते मुंबई अशी विमान सेवा वाढवण्याची घोषणा केली आहे. आज या दोन्ही मार्गांवर दोन अतिरिक्त विमानं चालवली जाणार आहेत. तर EaseMyTrip ने देखील 30 एप्रिल पर्यंत तिकीटं रद्द करणं, रिशेड्युल करणं मोफत केले आहे.