PNG IPO | Instagram and Pixabay.com

PN Gadgil Jewellers IPO Listing: पीएन गाडगीळ ज्वेलर्सच्या IPO ला गुंतवणूकदारांची जोरदार मागणी आहे तर आज ज्यांना आयपीओ लागले आहेत त्यांचं लक्ष शेअर लिस्टिंग कडे लागले आहे. पीएन गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ लिस्टिंग तारीख आज, (17 सप्टेंबर) आहे. पीएन गाडगीळ ज्वेलर्सचा आयपीओ 10 सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आणि 12 सप्टेंबर रोजी बंद झाला. आयपीओ वाटप 13 सप्टेंबर रोजी निश्चित करण्यात आले होते आणि शेअर्स आज लिस्ट होणार आहे.

आजपासून पीएन गाडगीळ ज्वेलर्सचे इक्विटी शेअर्स लिस्ट केले जाणार आहेत. BSE वर नोटीसीनुसार, 'बी' ग्रुप ऑफ सिक्युरिटीजच्या लिस्ट मध्ये लिस्ट केले जाणार आहेत.

पी एन गाडगीळ ज्वेलर्स शेअर्स हे स्पेशल प्रू ओपन सेशन आणि शेअर्स मध्ये आज सकाळी 10 वाजल्यापासून ट्रेडिंगसाठी दिसणार आहेत. Analysts ना PN Gadgil Jewellers IPO listing ना चांगला प्रतिसाद अपेक्षित आहे.

आज PN Gadgil Jewellers IPO GMP ची प्रति शेअर किंमत 300 रूपये आहे. त्यामुळे ग्रे मार्केट मध्ये इश्यू प्राईज पेक्षा त्याची अधिक किंमत ट्रेड होण्याची शक्यता आहे. आज PN गाडगीळ ज्वेलर्स IPO GMP आणि इश्यू किंमत लक्षात घेता, PN गाडगीळ ज्वेलर्स IPO सूची किंमत ₹780 प्रति शेअर चा अंदाज आहे ही किंमत प्रति शेअर 62.5% च्या प्रीमियमवर आहे. नक्की वाचा: P N Gadgil Jewellers IPO Launches: पी एन गाडगीळ ज्वेलर्स आयपीओ, GMP आणि इतर तपशील घ्या जाणून.  

NSE, BSE वर दमदार सुरूवात  

PN गाडगीळ ज्वेलर्सच्या शेअरची किंमत NSE वर ₹830 आणि BSE वर ₹834 वर उघडली, जी ₹480 च्या इश्यू किमतीपेक्षा जास्त आहे. IPO ने ₹330 कोटी उभारले आणि 59.41 पटीने ओव्हरसबस्क्राइब केले गेले, ज्यामुळे गुंतवणूकदारांची मजबूत मागणी दिसून येत  आहे.