बदली केल्याच्या रागातून Sub-Inspector ने केला 65 किमी धावण्याचा केला निर्धार; 40 KM नंतर झाला बेशुद्ध (Video)
विजय प्रताप (Photo Credit : Twitter)

उत्तर प्रदेशमधील इटावा (Etawah) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इटावा येथे बदली झाल्यामुळे संतप्त झालेल्या पोलीस निरीक्षकाने (Sub-Inspector) निषेध म्हणून 65 किमी धावण्याचा निर्धार केला. हक्कांचा गैरवापर करून बदली करण्यात आली, याच विरोध करण्यासाठी या निरीक्षकाने हा धावण्याचा निर्णय घेतला होता.  65 किमी धावून लोकांना जागरूक करण्याची त्यांची इच्छा होती. सुमारे 40 किलोमीटर अंतर कापल्यानंतर निरीक्षक विजय प्रताप चक्रनगरमधील हनुमंतपुराजवळ बेशुद्ध पडले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना रस्त्यावरून उचलून अंथरुणावर झोपवले आणि रुग्णवाहिका बोलविण्यात आली.

विजय प्रताप यांची त्यांच्या मर्जीविरुद्ध बिठोली पोलिस ठाण्यात बदली झाली होती. याबाबत बोलताना विजय प्रताप म्हणाले, ‘एसएसपीने मला पोलिस लाईनमध्येच रहाण्यास सांगितले होते, परंतु आरआयने जबरदस्तीने बिठोली पोलिस ठाण्यात माझी बदली केली. तुम्ही याला माझा राग म्हणा किंवा असंतोष म्हणा, मी धावत बिठोलीला जाण्याचे ठरविले आहे.' विशेष म्हणजे विजय प्रताप हे रस्त्यात मध्येच पडल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली आहे आणि सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. (लग्नासाठी रजा नाकारल्याने पोलीस कर्मचा-याने वरिष्ठावर झाडल्या १३ गोळ्या)

दरम्यान, याधीही विजय प्रताप यांनी बिठोली पोलिस ठाण्यात ड्युटी केली आहे. त्यानंतर त्यांची बदली पोलिस लाईनमध्ये झाली होती. दुसरीकडे आसाम (Assam) राज्यात सशस्त्र पोलीस दलाच्या कर्मचा-याने वरिष्ठावर आपल्या बंदुकीतून 13 गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. रजा नाकारल्यामुळे त्याचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक भोलानाथ दास यांच्याशी वाद झाला. वादानंतर लक्ष्मीकांत याने थेट दास यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात दास यांचा जागीच मृत्यू झाला होता.