नवी दिल्ली, 30 जुलै : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Association) सोमवारी 29 जुलैला लोकसभेत (Lok Sabha) वैद्यकीय ठरावाला (Medical Bill) मंजुरी दिली. मात्र यामुळे वैद्यकीय क्षेत्रात बनावटी व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल असे म्हणत इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association) या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभुमीवर उद्या म्हणजेच 31 जुलैला सकाळी 6 पासून देशभरातील सरकारी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग (OPD) बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय असोसिएशनने मेडिकल विद्यार्थ्यांना एकत्रपणे वर्ग बुडवून ठिकठिकाणी करण्यात येणाऱ्या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच, रहिवाशी डॉक्टर असोसिएशन व फेडरेशनने आपल्या सदस्यांना उद्या काळी फित बांधून काम करण्यास सांगितले आहे.
ANI ट्विट
Indian Medical Association (IMA) calls for 24 hours withdrawal of non-essential services across the nation from 6 am, tomorrow, in protest against the passing of National Medical Commission Bill, 2019 in Lok Sabha. pic.twitter.com/8DUFrHvOhJ
— ANI (@ANI) July 30, 2019
आयएमए चे सेक्रेटरी जनरल आर. वी. अशोकन यांच्या माहितीनुसार, वैद्यकीय विधेयकातील अनेकश्या तरतुदी या डॉक्टर आणि वैद्यकीय सुविधांच्या अनुषंगाने घातक ठरू शकतात, यामुळे वैद्यकीय क्षेत्रातही राजकीय हस्तक्षेप वाढण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ विधेयकाच्या कलम 32 प्रमाणे, पदवी प्राप्त नसलेल्या व अनानुभवी अशा सुमारे साडे तीन लाख व्यक्तींना औषधांचे नवे तंत्रज्ञान वापरण्यास मुभा देण्यात आली आहे, हे व्यक्ती केवळ राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात सदस्य असल्यास त्यांना ही परवानगी मिळणार आहे. यातून गरजू रुग्णांच्या जिवाशी खेळ करण्यापेक्षा सरकारने वैद्यकीय कॉलेजांची संख्याव पर्यायाने डॉक्टरांची संख्या वाढवावी अशी मागणी सुद्धा अशोकन यांनी मांडली आहे.
दरम्यान, उद्या देशभरातील रुग्णालयात ओपीडी सेवा बंद असल्याने गरजू रुग्णांची नाहक परवड होण्याची चिन्हे दिसत आहेत. मात्र या विधयेकाला विरोध न केल्याने भविष्यात डॉक्टरांच्या अधिकारांची हेळसांड होईलच पण सोबतच रुग्णांची देखील आबाळ होउ शकते, त्यामुळे सरकारने वैद्यकीय विधयेकात योग्य त्या सुधारणा कराव्यात अशी सूचना आयएमए कडून देण्यात आली आहे.