ऑनलाईन पद्धतीने तिकिटे करणाऱ्या नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार असून रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांवरील शुल्कात वाढ होणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना पूर्वीपेक्षा अधिक शुल्क ऑनलाईन तिकिट बुकिंसाठी द्यावे लागणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार इ-तिकिटावर अतिरिक्त सर्विस चार्ज लावण्यात येणार असल्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे.
तिकिटांवरील सर्विस चार्जसंबंधित रेल्वे मंत्रालयामधून एक पत्र आले असून त्यामध्ये ऑपरेटिंग कॉस्ट पुन्हा एकदा वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये विक्री आणि मार्केटिंगसाठी लागणारा सर्विस चार्ज घेतला जाणार आहे. सू्त्रांनुसार 2016 मध्ये रेल्वे मंत्रालयाने सर्विस चार्ज न लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ऑनलाईन तिकिटांवरील शुल्कात वाढ करण्यात येणार आहे.(प्रवाश्यांचा वेळ वाचणार, जनरल तिकिट ही मिळणार ऑनलाईन)
2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर डिजिटल पद्धतीने व्यवहार होण्याच्या उद्देशाने इ-तिकिटांवरील अतिरिक्त शुल्क रद्द केला होता. तरीही 2016 पर्यंत प्रवाशांकडून इ-तिकिटांवर अतिरिक्त शुल्क आकारला जात होता. त्यावेळी स्लीपर तिकिटावर 20 रुपये आणि AC तिकिटावक 40 रुपये सर्विस चार्ज वसूल केला जात होता.मात्र आता ऑनलाईन तिकिटांवरील शुल्कात वाढ केल्यास डिजिटल व्यवहारावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नाही तर रेल्वे स्थानकावर तिकिट खरेदी करण्यासाठी लांबच्या लांब रांगा दिसून येतील.