ऑनलाईन पद्धतीने Money Transfer करतायत? डिसेंबर महिन्यापासून बदलणार नियम, जाणुन घ्या अधिक
बँक (Photo Credits: Twitter)

वेळेनुसार काही नियम सुद्धा बदलल्याचे दिसून येतात. बँकिंग आणि फायनान्स सेक्टर सुद्धा यामध्ये सामील आहेत. तर बँकिंग सेक्टरची जेव्हा गोष्ट येते तेव्हा फंड ट्रान्सफर करणे ही एक महत्वाचे काम मानले जाते. तर गेल्या काही महिन्यात मनी ट्रान्सफर करण्याच्या गोष्टी फार वाढल्या आहेत. याच दरम्यान, RTGS च्या माध्यमातून नागरिकांना दोन लाखांहून अधिक रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी सोपा मार्ग मानला जातो. आरटीजीएस संबंधित काही नियम येत्या डिसेंबर मध्ये बदलणार आहेत.

1 डिसेंबर पासून रियल टाइम ग्रॉस सेटलमेंटची सुविधा आठवड्याचे सात दिवस आणि वर्षाचे सर्व दिवस उपलब्ध असणार आहे. यापूर्वी महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार सोडून आरटीजीएसची सुविधा उपलब्ध होती. मात्र आता नव्या नियमानुसार, याचा फायदा आता मोठी रक्कम ट्रान्सफर करणाऱ्यांना होणार आहे. तर गेल्याच वर्षापासून एनईएफटीची सुविधा 24 तास सुरु करण्यात आली आहे.(Double-Decker Coach: भारतीय रेल्वेने बनवले आधुनिक सुविधांनी सुसज्ज डबल डेकर कोच; स्पीड 160 किमी प्रतितास, जाणून घ्या खासियत Watch Video)

आरबीआयचे गवर्नर शक्तिकांत दास यांनी गेल्या महिन्यात पार पडलेल्या एका बैठकीनंतर ही माहिती दिली होती की, या वर्षाच्या डिसेंबर महिन्यापासून आरटीजीएसची सुविधा 27 तास नागरिकांसाठी सुरु राहणार आहे. तर 2019 मध्ये आरबीआयने NEFT ची सुविधा नागरिकांसाठी संपूर्ण वर्षभरासाठी सुरु करुन दिली होती.