किरकोळ बाजारात कांदा 150 रुपये प्रति किलो, नववर्षात दिलासा मिळण्याची शक्यता
Onions (Photo Credits: IANS)

कांद्याचे दर वाढल्याने सामान्यांच्या शिखाला चांगलीच कात्री बसली असून त्यांची किंमत प्रति किलो 150 रुपये झाली आहे. मात्र या दरवाढीचा फटका अजून काही दिवस बसणार आहे. परंतु नव्या वर्षात ग्राहकांना कांद्याच्या किंमती कमी होणार असल्याने दिलासा मिळण्याची शक्यता अधिक व्यक्त केली जात आहे. सध्या एनएएफईडी यांच्याकडील कांद्याचा स्टॉक संपला आहे. राज्यात विविध ठिकाणी कांद्याचे दर 120 ते 150 रुपयांवर जाऊन पोहचले आहेत. बाजारात कांद्याचे दराने शंभरी पार केली आहे. यामुळे ग्राहकांकडून वाढलेल्या कांद्याच्या किंमतीमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याचे दर वाढले आहेत. मात्र आता कांद्याचा स्टॉक संपल्याने लोक याच्या विरुद्ध संसदेत आंदोलन करत आहेत. तसेच 25 ते 30 टक्के कांद्याची शेतीचे नुकसान झाले आहे. परंतु आता विदेशातून कांदा मागवणार असल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.केंद्र सरकारने कांद्याची साठवणूक करण्यावर बंदी घालण्यासाठी 3 डिसेंबर किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांकडील कांद्याचा स्यॉक 5 टन आणि 25 टन केला होता. तर आयात केलेल्या कांद्याच्या स्टॉकसाठी किती सीमा असावी हे ठरवण्यात आलेले नाही. तर कांद्याच्या किंमतीत सुधारणा आणण्यासाठी 1.2 लाख टन कांद्याची आयात करण्यावर मंजूरी देण्यात आली आहे. सरकारने किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यापूर्वीच निर्यातीवर बंदी घातली आहे. (कांदा शंभरीपार! नेटीझन्सनी बनवले TikTok वर मजेशीर व्हिडिओ Watch Video)

राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कांदा पिकाला बसला आहे. देशभरात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. ग्राहकांना कांदा विकत घेणं आता कठीण होऊन बसलं आहे. सध्या घाऊक बाजारात जुन्या कांद्याचे दर 80 ते 90 रुपये किलो पर्यंत पोहचले आहेत. तर किरकोळ बाजारात कांदा 100 रुपये किलो दराने विकला जात आहे.