प्रतिकात्मक फोटो (Archived, edited, symbolic images)

राज्यात सध्या कांद्याचे दर 100 रुपयांच्या वर गेल्याने सामान्यांना त्याचा फटका बसला आहे. मात्र आता पुढील आठवड्यात आवक बाजारात नव्या कांद्याचा पुरवठा होणार असल्याने किंमती कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दिल्ली येथे शुक्रवारी कांद्याच्या आवकात वाढ झाल्याने थोक भावात कपात झाल्याचे दिसून आले आहे.

आयएनएस यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, दिल्ली येथे किरकोळ कांदा 80-120 रुपये किलोने विकला जात आहे. तर शुक्रवारी दिल्ली येथे कांद्याच्या दरात 4 रुपयांनी वाढ होत 98 रुपये प्रति किलो झाला आहे. बाजारातील विक्रेत्यांनी कांद्याच्या दरवाढी बाबत असे म्हटले आहे की, पुढील आठवड्यात गुजरात आणि महाराष्ट्रात नव्या कांद्याचे उत्पादन येणार आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता आहे.नव्या वर्षात ग्राहकांना कांद्याच्या किंमती कमी होणार असल्याने दिलासा मिळण्याची शक्यता अधिक व्यक्त केली जात आहे.(कांदा शंभरीपार! नेटीझन्सनी बनवले TikTok वर मजेशीर व्हिडिओ Watch Video)

सध्या एनएएफईडी यांच्याकडील कांद्याचा स्टॉक संपला आहे. केंद्र सरकारने कांद्याची साठवणूक करण्यावर बंदी घालण्यासाठी 3 डिसेंबर किरकोळ आणि घाऊक विक्रेत्यांकडील कांद्याचा स्यॉक 5 टन आणि 25 टन केला होता. तर आयात केलेल्या कांद्याच्या स्टॉकसाठी किती सीमा असावी हे ठरवण्यात आलेले नाही. तर कांद्याच्या किंमतीत सुधारणा आणण्यासाठी 1.2 लाख टन कांद्याची आयात करण्यावर मंजूरी देण्यात आली आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कांदा पिकाला बसला आहे. देशभरात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. ग्राहकांना कांदा विकत घेणं आता कठीण होऊन बसलं आहे. सध्या घाऊक बाजारात जुन्या कांद्याचे दर 80 ते 90 रुपये किलो पर्यंत पोहचले आहेत. तर किरकोळ बाजारात कांदा 100 रुपये किलो दराने विकला जात आहे.