Omicron Spread: मिनिस्ट्री ऑफ अफेअर्स (MHA) यांनी गुरुवारी कोविड19 संदर्भातील गाइडलाइन्स या येत्या 28 फेब्रुवारी पर्यंत कायम राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी सुद्धा नियमात शिथीलता आणू नये असे म्हटले आहे. अजय कुमार भल्ला यांनी असे म्हटले की, सध्याच्या कोरोनाच्या लाटेमुळे, नवा वेरियंट ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या आकड्यात समांतर पद्धतीने वाढ होत आहे.(Vaccination of Children: कोरोनाविरोधी लस घेण्यास नक्की कोणती मुले आहे पात्र? सरकारने स्पष्ट केली वयाची अट)
दरम्यान, अॅक्टिव्ह रुग्ण हे लवकर बरे होतायत आणि रुग्णामध्ये भर्ती होण्याचे प्रमाण ही घटले आहे. परंतु 34 राज्यातील 407 जिल्ह्यात आणि केंद्रशासित प्रदेशात पॉझिटिव्हीटी रेट हा 10 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे कोरोनाच्या नव्या वेरियंटपासून सावधगिरी आणि दक्षता बाळगणे आवश्यक असल्याचे भल्ला यांनी म्हटले.(COVID 19 Vaccine Update: Covishield आणि Covaxin ला ओपन मार्केट मध्ये विक्रीसाठी DCGI ची काही अटी शर्थींसह मंजुरी)
Tweet:
In wake of rising COVID cases, Union Home Secretary writes to chief secretaries all States/UTs, asking to issues necessary directions to authorities concerned for effective management of the disease
"All States/UTs must observe all precautions¬ let the guard down,"he writes pic.twitter.com/2sXdPEbWUw
— ANI (@ANI) January 27, 2022
त्यांनी पुढे असे ही म्हटले की, राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांनी सावधगिरी बाळगावी. त्यामध्ये कोणतीही कसर पडू देऊ नये. तसेच फाइव्ह फोल्ड स्ट्रॅटेजी म्हणजे म्हणजे टेस्ट-ट्रॅक-ट्रिट-लसीकरण आणि कोविड19 च्या परिस्थितीवर लक्ष ठेवणे. तसेच राज्य सरकाराने नागरिक मास्क घालत आहेत का किंवा सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करतायत का याकडे कटाकक्षाने लक्ष द्यावे. तसेच नागरिकांना चुकीच्या माहितीपासून दूर ठेवण्यासाठी राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशांनी पत्रकार परिषद घ्याव्यात.