OMG: शस्त्रक्रियेदरम्यान तरुणाच्या पोटातून बाहेर काढले तब्बल 63 स्टीलचे चमचे; प्रकृती गंभीर, Uttar Pradesh मधील धक्कादायक घटना
Doctors | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका खासगी रुग्णालयातील रुग्णाच्या पोटातून स्टीलचे चमचे (Steel Spoons) काढण्यात आले आहेत. ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून एक-दोन नव्हे तर एकामागून एक असे तब्बल स्टीलचे 63 चमचे काढले. रुग्णाची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टर रुग्णाच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. कुटुंबीयांनी या व्यक्तीला शामली व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मन्सूरपूर पोलीस ठाण्याच्या बोपाडा गावातील रहिवासी विजय याला ड्रग्जचे व्यसन आहे. त्यामुळे विजयच्या कुटुंबीयांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. विजयला पाच महिन्यांपूर्वी शामली जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना मुझफ्फरनगर येथील खासगी रुग्णालयात आणले.

विजयची तपासणी करून डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली असता, त्याच्या पोटातून 63 स्टीलचे चमचे बाहेर काढले. रुग्णालयातील अनेक वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी असे प्रकरण पहिल्यांदाच पाहिले होते. तरुणाच्या पोटातून इतक्या मोठ्या प्रमाणावर चमचे बाहेर पडल्याने कुटुंबीयही आश्चर्यचकित झाले आहेत. सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की, चमचे पोटात गेलेच कसे? सध्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. (हेही वाचा: Video: मोक्ष मिळावा म्हणून 22 वर्षीय तरुणाने घेतली जमिनीच्या खाली समाधी; 4 पुजाऱ्यांनी केली मदत, पोलिसांनी केली सुटका)

विजयच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, व्यसनमुक्ती केंद्रातील कर्मचाऱ्यांनी त्याला जबरदस्तीने चमचे खायला दिले असावेत. मात्र, अद्याप पीडितेकडून कोणतीही माहिती समोर आली नाही. या संपूर्ण प्रकरणावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, चमचे पोटात गेले कसे यापेक्षा रुग्णाचा जीव वाचवणे ही सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट होती. रुग्णाची प्रकृती अजूनही धोक्यात आहे, त्यामुळे जोपर्यंत त्याच्या तब्येतीमध्ये सुधार होत नाही, तोपर्यंत या प्रकरणाची माहिती मीडियासमोर येणार नाही.