Jyoti| Photo Credits: Twitter

भारतामध्ये मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे गोर गरीब, तळहातावर पोट असणार्‍या अनेकांचे हाल झाले आहेत. अशामध्ये 15 वर्षीय ज्योती कुमारी या मुलीने गुरूग्राम ते दरभंगा असा 1200 किमीचा सायकल प्रवास करून आजारी वडिलांना घरी पोहचवले. दरम्यान तिच्या जिद्दीचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांची लेक इवांका ट्रम्प कडूनही कौतुक करण्यात आलं होतं. मात्र या ट्वीटवर जम्मू कश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करत उत्तर दिलं आहे. 'तिने 1200 किमी सायकल चालवली ती जणू आनंदाने असा तिच्या जिद्दीचा गौरव केला जातोय. सरकारने तिची निराशा केली आहे.' अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं आहे. लॉकडाऊनमुळे गुरुग्राम ते दरभंगा हा 1200 किमी चा प्रवास जखमी वडिलांना घेऊन सायकलवरुन करणाऱ्या ज्योती कुमारी हिचे इंवाका ट्रम्प कडून कौतुक! (View Tweet)

ओमर अब्दुल्ला ट्वीट

दोन महिन्यांपूर्वी जेव्हा लॉकडाऊन घोषित झाला तेव्हा ज्योती आणि तिचे वडील गुरूग्रामला होते. दरम्यान अपघातामध्ये ज्योतीचे वडील आजारी पडले. अशा परिस्थितीमध्ये ज्योतीने सायकल प्रवास करून वडिलांना सुखरूप घरी नेले. सात दिवस प्रवास करून घरी पोहचवण्यात आलं आहे. ज्योती कुमारीची हकिकत समजल्यानंतर सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला चाचणीसाठी बोलावले आहे. जर ज्योतीने Trials चा टप्पा पूर्ण केला, तर Nation Cycleing Academy च्या कॉम्प्लेक्स मध्ये Trainee म्हणून तिची निवड होऊ शकते. अशी माहिती सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी पीटीआयला दिली आहे.