हवाई सुंदरी आणि वैमानिकामध्ये विमानात रंगला प्रणय, प्रवाशाच्या तक्रारीमुळे दोघेही निलंबित
Spicejet | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

आजकालचे प्रेमीयुगुल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी जगाची पर्वा न करता जिकडे जागा मिळेल तिकडे अगदी सार्वजनिक ठिकाणी आपल्या प्रेमाचे लोकांसमोर प्रदर्शन करतात. असे करत असताना कधी त्या प्रेमाचे रुपांतर अश्लील चाळ्यांत होते याचे भान देखील उरत नाही. असेच काहीसे घडलय एका हवाई सुंदरी (Flight Attendant) आणि वैमानिकाच्या (Pilot) बाबतीत. ऑफड्युटी असलेल्या वैमानिकाने आणि ऑनड्युटी असलेल्या हवाईसुंदरीने चक्क विमानातच आपल्या प्रणयात इतके मश्गुल होते की त्यांना सहप्रवाशांचे भान राहिले नाही. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, हा अश्लील प्रकार पाहून त्या विमानातील सहप्रवाशाने त्या दोघांची तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरुन त्या दोघांनाही कंपनीने निलंबित केले आहे.

ही घटना मागील महिन्यात घडली. हा वैमानिक आणि हवाईसुंदरी SpiceJet च्या दिल्ली-कोलकता फ्लाइटने प्रवास करत होते. यात वैमानिक हा ऑफड्युटी होता तर ती हवाईसुंदरी ऑनड्युटी होती. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळाने ते दोघे विमानातील मागच्या सीटवर प्रणय क्रिडा करु लागले. यात ते इतके मश्गुल झाले की त्यांना इतरांचे काही भानच उरले नाही.

हेदेखील वाचा- 24 वर्षीय हवाई सुंदरीवर बलात्कार, आरोपी निघाला तरुणीचा मित्र

अखेर काही वेळाने त्याचे हे अश्लील चाळे सहप्रवाशाच्या निदर्शनास आले. त्याने ताबडतोब त्या दोघांची तक्रार केली. त्या प्रवाशाच्या तक्रारीवरुन त्या दोघांना कंपनीने तात्काळ निलंबित केले.

तक्रारदाराच्या ने दिलेल्या माहितीनुसार, हवाईसुंदरीचे प्रवाशांशी वर्तणूकही चांगले नव्हते. तसेच ऑनड्युटी कोणत्याही कर्मचा-याने असे वर्तणूक केल्यास त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे कंपनीने सांगितले.