एका 24 वर्षीय हवाई सुंदरीवर (Air Hostess) दोघांनी बलात्कार केल्याची घटना मुंबईतील जोगेश्वरी भागात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी स्वप्नील बडोनिया (24) याला अटक केली असून तो सुद्धा पीडित तरुणी जेथे नोकरी करत होती, त्या विमान कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हैदराबादहून आलेली ही हवाई सुंदरी मुंबई विमानतळाबाहेर पडत असताना स्वप्नील तिला भेटला. तिला कारमध्ये बसवून स्वप्नील मालाड इन्फिनिटी मॉलजवळील तिच्या घराजवळ घेऊन गेला. एका रेस्टॉरंट आणि बारमध्ये त्यांनी रात्री उशिरापर्यंत मद्यसेवन केले. रात्री घरी परतणे योग्य ठरणार नाही म्हणून ही तरुणी स्वप्नीलच्या जोगेश्वरी महाकाली रोडवरील घरी गेली. या ठिकाणी स्वप्नील, त्याचा एक मित्र आणि एक महिला सहकारी राहत होती. दारूच्या नशेत असलेला स्वप्नील आणि त्याच्या मित्राने मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे.
विरार: मित्राला झाडाला बांधून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी एक आरोपी अटकेत
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.