ओडिशा: नव्याने खरेदी केलेल्या स्कूटरला 1 लाख रुपयांचा दंड, नेमका काय प्रकार घडला वाचा सविस्तर
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

देशभरात नव्या वाहतूकीच्या नियमांची अंमलबजावणी 1 सप्टेंबर पासून करण्यात आली आहे. त्यानुसार आता वाहतूकीचे नियम मोडल्यास दंडाची रक्कम पूर्वीपेक्षा दहापट अधिक स्विकारण्यात येत आहे. तर वाहतूकीचे नवे नियम लागू झाल्यानंतर आतापर्यंत लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई वाहन चालकांवर करण्यात आली आहे. तर असाच एक प्रकार ओडिशा (Odisha) येथे नव्याने घेतलेल्या स्कूटर संदर्भात घडला आहे. या नव्याने खरेदी केलेल्या स्कूटरला तब्बल 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ओडिशा येथील एका तरुणीने नवी स्कूटर 65 हजार रुपयांना खरेदी केली. मात्र शोरुम मधून बाहेर आल्यानंतर स्कूटरला वाहन क्रमांक नसल्याच्या कारणावरुन रोखले आणि 1 लाख रुपयांचा दंड सुनावला. परंतु 12 सप्टेंबरला कटक या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी लावली होती. त्यावेळी अरुण पांडा नावाच्या व्यक्तीला तेथे थांबवत त्याच्याकडून गाडीचा रजिस्ट्रेशन क्रमांक विचारला. परंतु रजिस्ट्रेशन क्रमांक नसल्याने पांडा याला आरटीओकडून 1 लाख रुपयांचा दंड सुनावला. तसेच स्कूटर ही कविता पांडे नावाने खरेदी करण्यात आल्याने त्याचे सर्व खापर स्कूटी डिलरवर फोडला.

या प्रकरणी डीलरवर सर्व आरोप लावण्यात आले असून त्यानेच आपल्याला गाडीचा रजिस्ट्रेशन क्रमांक दिला नसल्याचे पांडा याने आरटीओला सांगितले. त्याचसोबत गाडीसंबंधित दंडात्मक कारवाई डीलरवर करण्यात यावी असे सुद्धा सांगितले. त्यानुसार संबंधित डीलरकडून गाडीवरील दंडाची रक्कम सुनावली आहे. त्याचसोबत डीलरच्या दुकानाचा परवानासुद्धा रद्द करण्यात यावा असा आदेश दिला आहे. (दिल्लीत वाहतूक पोलिसांनी 'भगवान राम' यांच्याकडून वसूल केली सर्वात मोठी दंडाची रक्कम, नेमका काय प्रकार घडला जाणून घ्या)

तर काही दिवसांपूर्वी राजस्थान मधील एका ट्रक चालकाला गेल्या 5 सप्टेंबर रोजी गाडीत क्षमतेपेक्षा अधिकतम सामान भरल्याने पोलिसांनी पडकले होते. त्यानुसार त्याच्याकडून 1,41,700 रुपयांची दंड वसूली करण्यात आली होती.