प्रतिकात्मक फोटो ( फोटो सौजन्य- फेसबुक )

नव्या वाहतूकीच्या नियमानुसार राज्यभरात त्याची कठोर अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम आता पूर्वीपेक्षा दहापटीने वाढवण्यात आली आहे. याच स्थितीत दिल्लीत एका ट्रककडून लाखो रुपयांपेक्षा अधिक दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आता पर्यंत ही सर्वात दंड वसूलीची रक्कम असल्याचे सांगितले जात आहे.

राजस्थान मधील एका ट्रक चालकाला गेल्या 5 सप्टेंबर रोजी गाडीत क्षमतेपेक्षा अधिकतम सामान भरल्याने पोलिसांनी पडकले होते. त्यानुसार त्याच्याकडून 1,41,700 रुपयांची दंड वसूली करण्यात आली होती.त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी रोहिणी जिल्हातील कोर्टात मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट येथे जाऊन दंडाची रक्कम पूर्णपणे भरली. तर ट्रक चालकाचे खरे नाव भगवान राम असे असून त्याने दंडाची रक्कम भरली आहे.(गुजरात मध्ये वाहतुकीच्या दंडामध्ये कपात, अशाप्रकारे कोणत्याही राज्याला नियमात बदल करता येणार नाही- नितीन गडकरी)

मोटार वाहन विधेयक जुलै 2019 मध्ये संसदेत मंजूर करण्यात आले. त्यानंतर वाहतूकीचे नियम मोडल्यास दंडाच्या रक्कमेत ही वाढ करण्यात आली. 1 सप्टेंबर पासून देशभरात नव्या वाहतूकीच्या नियमानुसार कारवाई करण्यात येत आहेय